खापर। सातपुड्याच्या कुशीत वसलेल्या अक्कलकुवा तालुक्यातील खापर गाव व परिसरात गेल्या पाच वर्षात कमी पावासामुळे पाण्याची पातळी कमालीची खालावली आहे. त्यामुळे पाण्याची टंचाई जाणवत आहे.पाणीटंचाईवर मात करण्यासाठी ग्रामपंचायतीकडून विविध उपायायोजना करण्यात येत आहेत अशी माहिती पाणीपुरवठा समितीचे अध्यक्ष ललीतकुमार जाट यांनी दिली.
ठिकठिकाणी ग्रा.पं.ने केल्या बोअरवेल
मागील चार वर्षांत ग्रामपंचायतीने एकूण 20 बोअरवेल केल्या आहेत. मात्र तापमानात प्रचंड वाढ झाल्याने पाणीपातळी खालावली आहे,त्यामुळे ग्रामपंचा यतीने आणखी 9 ठिकाणी नवीन बोअरवेल केले, बोअरचे पाणी विहिरीत टाकून गावात पाणीपुरवठा केला जात आहे. खापर गावात एकूण 9 हातपंप असून त्यांचाही वापर होत आहे, तसेच 4 ते 5 खाजगी बोअर नळ वहिनीला जोडले आहेत. पाण्याचा वापर काटकसरीने करण्याचे आवाहन सरपंच रामसिंग पाडवी, प्रियांका अग्रवाल, किरण पाडवी, लक्ष्मन वाडीले, राजाराम पाडवी, देविदास वसावे, नीलिमा पाडवी, सोनल गुलाले, मालतीबाई वसावे, निर्मला पाडवी, गीता वसावे,योगिता जैन, वीजयता बोरसे , शरीफ खाटीक आदींनी केले.