पुणे-१९६० साली महाराष्ट्र संयुक्त झाला. तेव्हापासून आतापर्यंत पाटबंधारे खात्याचा पैसा कुठ गेला. आतापर्यंत हे पाणी पाटबंधारे खात्यात जे पाणी मुरल ते अडवले असते. तर राज्यातील पाण्याची पातळी वाढली असती. असा टोला राज ठाकरे यांनी अजित पवारांना त्यांनी लगावला. पुणे येथे पानी फाऊंडेशनच्या कार्यक्रमाला त्यांनी हजेरी लावली होती, यावेळी ते बोलत होते. मुख्यमंत्री देखील यावेळी उपस्थित होते.
या कार्यक्रमात राज ठाकरे यांनी राजकीय भाषेत चौफेर फटकेबाजी केली. यावेळी राज ठाकरे यांनी अभिनेता अमिर खानच्या पानी फाऊंडेशनच्या कामाचे तोंडभरून कौतुकही केले. अमीर खान पाण्याच्या समस्ये बाबत जनजागृती करीत आहे. ही चांगली गोष्ट आहे. मात्र यासाठी सरकार काय करीत आहे. त्याचबरोबर पानी फाऊंडेशन सोबत सरकारी अधिकारी काम करत आहेत. मग सरकारसोबत काम का करीत नाही.असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला.
पानी फाऊंडेशनला जे जमले तर सरकारला का नाही जमले असा प्रश्नही मुख्यमंत्र्यासमोर उपस्थित केला. पक्ष, धर्म आणि जातीच्या पलिकडे पानी आहे, अमिर तुझे काम ग्रेट आहे. अमीर खान कोणताच पुरस्कार स्वीकारत नाही. पण त्यांनी मॅगँसेस पुरस्कार मिळेल तो स्वीकारावा अशी विनंतीही यावेळी राज ठाकरे यांनी अमिर खानला केली. पानी फाऊंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेच्या बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सिनेअभिनेता अमीर खान, किरण राव, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, विधानसभा विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष खासदार अशोक चव्हाण, गृहराज्यमंत्री राम शिंदे आणि राज्यमंत्री शिवतरे यांची प्रमुख उपस्थिती होती.