नंदुरबार। पाणी हे जीवन आहे, पाणी हे मौल्यवान आहे भविष्यात पाण्याची बचत करण्यासाठी पाण्याबचतीबाबत मोठ्या प्रमाणावर जनजागृती करुन सर्वांनी जलदूताची भूमिका बजावणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी केले.नंदुरबार मध्यम प्रकल्प विभागामार्फत 16 मार्च ते 22 मार्च या कालावधीत ‘जलजागृती सप्ताह’ राबविण्यात आला. नंदुरबार पंचायत समिती सभागृहात या सप्ताहाचा समारोप करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. कलशेट्टी बोलत होते.
या सप्ताहानिमित्त वॉटर रन व रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सहाय्यक जिल्हाधिकारी निमा अरोरा, नंदुरबार मध्यम प्रकल्प विभागाचे कार्यकारी अभियंता डी. डी. जोशी, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी सुभाष नागरे, जि.प.लघुसिंचन विभाग कार्यकारी अभियंता श्री. शिरसाठ, तहसिलदार नितीन पाटील, गट विकास अधिकारी उदय कुसरकर आदि मान्यवर यावेळी उपस्थित होते.