पाणी योजना निविदांना पुन्हा अल्प प्रतिसाद

0

पुणे । पुणे शहरातील बहुचर्चित 24 तास पाणीपुरवठा योजनेच्या एकूण सहा टप्प्यांपैकी पाच निविदांना मुदतवाढीनंतरही अत्यल्प प्रतिसाद मिळाला आहे. या योजनेच्या पहिल्या टप्पातील कामासाठी मुदतवाढीनंतर अवघी एकच निविदा आली आहे. 24 तास पाणीपुरवठा योजनेच्या कामाचे एकूण सहा टप्प्यांत विभाजन करण्यात आले आहे. निविदापूर्व बैठकीत सहभागी कंपन्यांनी केलेल्या मागणीप्रमाणे आयुक्त कुणाल कुमार यांनी या निविदेत जॉइन्ट व्हेन्चर करण्यास मान्यता दिली होती. त्यानंतर या निविदेची मुदत वाढून पाच जानेवारी करण्यात आली होती.

दुसर्‍या, तिसर्‍या टप्प्यासाठी तीनच निविदा
या पहिल्या टप्प्यातील पर्वती जलशुद्धीकरण केंद्राच्या झोनच्या 295 कोटींच्या कामांसाठी आणि चौथ्या टप्प्यातील कॅन्टोन्मेंट जलशुद्धीकरण केंद्राच्या झोन 319 कोटींच्या कामांसाठी केवळ दोन निविदा आल्या आहेत. या कामांसाठी तीन निविदा येणे अपेक्षित होते; पण केवळ दोनच निविदा आल्याने या कामाला 15 जानेवारीपर्यंत मुदतवाढ मिळाली आहे. उर्वरित दुसरा भामा-आसखेड जलशुद्धीकरण वेैंद्र झोनच्या 319 कोटींच्या कामांसाठी एल ऍण्ड टी, लक्ष्मी, एसपीएमएल या तीनच निविदा आल्या आहेत. तिसर्‍या टप्प्यातील वारजे आणि होळकर जलशुद्धीकरण वेैंद्र झोनच्या 542 कोटींच्या कामासाठी एल ऍण्ड टी, एसपीएमएल आणि जैन एरिगेशन यांच्या निविदा आल्या आहेत.

निविदामध्ये पुरेशी स्पर्धाच नाही
24 तास पाणी पुरवठा योजनेच्या सहाव्या टप्पातील ट्रान्समिशन सिस्टीमच्या 261 कोटींच्या कामासाठी पटेल इंजिनीअरिंग, टाटा, एल अ‍ॅण्ड टी, एसएमसी, जैन एरिगेशन, कोया, लक्ष्मी सिव्हिल यांच्या सात निविदा आल्या आहेत. मात्र पहिल्या ते पाचव्या टप्पाच्या कामाच्या निविदांना पुरेशा प्रमाणात प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे त्यात पुरेशी स्पर्धाच झालेली नाही. त्यामुळे या निविदांना पुन्हा मुदतवाढ दयायची की या सर्व निविदा पुन्हा एकदा रदद करायच्या या संभ्रमात प्रशासन पडले आहे.

295 कोटींच्या कामासाठी एकच निविदा
पाचव्या टप्प्यातील वडगाव जलशुद्धीकरण केंद्राच्या 469 कोटींच्या कामासाठी एल ऍण्ड टी, एसपीएमएल आणि जैन एरिगेशनच्या निविदा आल्या आहेत. एसपीएमएल ही काळया यादीतील वैंपनी आहे. त्यामुळे दुसरा, तिसरा आणि पाचव्या टप्पातील कामांच्या निविदामध्ये दोनच वैंपन्या शिल्लक राहत आहेत. त्यामुळे किमान तीन वैंपन्याचा यामध्ये सहभाग असणे आवश्यक आहे. अन्य दोन वैंपन्याबाबतही तांत्रिक अडचणी येण्याची शक्यता आहे. त्यामुळे एकुण पाच निविदांना येत्या 15 जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. या मुदतवाढीच्या कालावधीत पहिल्या टप्प्यातील पर्वती जलशुद्धीकरण केंद्रच्या झोनच्या 295 कोटींच्या कामासाठी एसपीएमएल यांची एकच निविदा आली आहे. यापुर्वी या कामासाठी जैनएरिगेशन आणि एल अ‍ॅन्ड टी ची निविदा आली आहे. दुसरा ते पाचव्या टप्पाच्या कामासाठी नव्याने एक ही निविदा आली नाही. त्यामुळे या निविदा प्रक्रियेत पुरेशी स्पर्धा झालेली नाही.