पाण्याखालील बंधार्‍यावरून वाहतूक सुरू

0

कोल्हापूर: राज्यात मोसमी स्थिरावण्याची चिन्हे असून नुकतेच झालेल्या मुसळधार पावसामुळे या भागातील धरण क्षेत्रातील पाण्याची पातळी वाढली आहे. पाण्याची पातळी वाढल्याने राजाराम बंधार्‍यावर पाणी वाहू लागले. मात्र तरीही काही वाहनचालक वाढलेल्या पाणीपातळीतूनच वाहने नेत असल्याचे दिसून आले.

गेल्या काही दिवसांपासून पावसाने ओढ दिली होती. मात्र गेल्या दोन दिवसांपासून पावसाने जोर घेतला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील धरक्षेत्रात जोरदार पाऊस होत आहे. राधानगर, दूधगंगा, कासारी, पाटगाव, कुंभी, कडवी, जांबरे कोदे अशा धरणक्षेत्रात अतिवृष्टी झाली. त्याचाच परिणाम म्हणून शहरातून जाणार्‍या पंचगंगा नदीच्या पाणीपात्रात वाढ झाली आहे.