शहादा । पाणी कसे मुरते हे एक तंत्रज्ञान आहे. शेतकर्यांना वीज व इंजिन दिले पण शेतात पाणी नाही तर शेतकरी शेतात काय पिकवणार आहे. त्यासाठी पाण्याचे नियोजन गरजेचे आहे. जंगलात पाऊस पडतो पण ते पाणी अडवले पाहिजे. पाऊस कमी पडत नाही. पाऊस पडतील 12 हजार मि लि लिटर. पाणी अडवले व जिरवले पाहिजे. नाल्यांमध्ये पाणी आडवले तरच शेतात बोरवेल व विहिरींना पाणी लागेल. यामुळे शेतकरी आत्महत्या करणार नाही. शासनाने त्यासाठी नियोजन करणे गरजे आहे. नदी, नाल्यांमध्ये शासनाने पाणी आडवले तर भूजल पाण्याची पातळी वाढणार आहे. सुरेश खानापुरकर हे जल व्यवस्थापन या विषयावर मार्गदर्शन करतांना म्हणाले.
कृषी साहित्याच्या स्टॉलला शेतकर्यांची भेट
शेतकरी परिषदेला तालुक्यातील शेकडो शेतकरी उपस्थित होते. आवारात शेतकर्यांसाठी शेतीउपयोगी 37 दुकाने लावण्यात आली होती. त्यात खते बियाणे , औषधी, माती परिक्षण , ठिबक सिंचन सह महिला बचत गटानी देखील दुकाने लावलेले होते. अनेक शेतकर्यांनी शेती सेवा केंद्रावरुन मार्गदर्शक सेवा पुस्तिक खरेदी केल्या. जळगाव , पाचोरा , नाशिक ,शहादा येथील दुकानदारानी स्टॉल लावले होते.
यांची होती उपस्थिती
शेठ व्ही. के. शहादा येथे शेतकरी परिषद घेण्यात आली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हाधिकारी डॉ मल्लिनाथ कलशेट्टी हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून प्रांताधिकारी लक्ष्मीकांत साताळकर, नगराध्यक्ष मोतीलाल पाटील , राष्ट्रवादीचे जिल्हा अध्यक्ष राजेद्रकुमार गावीत, तहसीलदार मनोज खरणार, पर्यावरण मित्र हदरभाई नुराणी, उपविभागीय वनाधिकारी एम. बी. कवटे ,आर्ट ऑफ लिवींगचे किशोर पाटील, प्रिती पाटील, तालुका कृषी अधिकारी श्री गावित हे होते.
सेंद्रीय खतांचा वापर करा
या पुढे बी. बी. शिंदे हे जमीन व खत व्यवस्थापन या विषयावर विचार मांडताना म्हणाले की, देशात जमीनचे क्षेत्र वाढत नाही. आहे त्या जमिनीवर चांगले उत्पादन कसे निघेल त्यासाठी सेंद्रिय खताचा वापर करुन शेती केली पाहिजे. उत्पादना बरोबर कमी खर्चात पीक निर्यात कसे करता येईल त्यासाठी शेतकर्यांना नियोजन करावे लागणार आहे.
कृषी साहित्याची विक्री
तर जल व्यवस्थापन या विषयावर सुरेश खानापुरकर, जमीन व खत व्यवस्थापन या विषयावर व्याख्याता म्हणून उपस्थित होते. प्रास्तविकात जिप सदस्य अभिजीत पाटील म्हणाले की, शेतकर्यांना शासनाच्या योजनांमध्ये सहभाग घेता येईल. यासाठी शेतकरी परिषद आयोजित केली आहे. सुत्रसंचालन विष्णु जोंधळे यांनी केले. रावेळी कृषी साहित्याची माहिती व विक्री सुरू होती. शेतकरी परिषदेत मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.