पातोंडा ग्रा.पं.च्या ग्रामसभेत विविध विषयांवर चर्चा

0

अमळनेर। तालुक्यातील पातोंडा ग्रामपंचायत येथे 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनानिमीत्त आयोजित ग्रामसभा सरपंच शितल पवार यांच्या अध्यक्षतेत शांततेत पार पडली. यात गावातील विविध विषयावर चर्चा करण्यात आली. ग्रामस्थांच्या समस्या सरपंचा पवार यांनी समजून घेतल्या व कामांच्या विषयी ग्रामसेवक व संबधित कर्मचारी यांना त्या सोडवण्याबाबत आदेश दिले. सरपंच शितल पवार व ग्रामपंचायत सदस्य यांनी लोकांना समाधानकारक लोकांना उतरे दिले तसेच अमळनेर तालुक्यातील काही गावात पाण्याची समस्या आहे. परंतु पाणीपुरवठा सुरळीत होत असल्याची माहीती उपस्थितांना दिली. सरपंच प्रतिनीधी म्हणून विनोद पवार हे स्वत: दिवसभर पाणीपुरवठा कर्मचारी यांच्यासोबत राहुन वार्ड नुसार पाणीपुरवठ्यावर लक्ष ठेवून आहेत. गावातल्या तुडुंब भरलेल्या गटारी साफ करण्यात आल्या आहेत. तसेच गटारातील ओला गाळ ट्रक्टरमध्ये भरून गावाबाहेर टाकण्यात आला आहे.

ग्रामसभेस यांची होती उपस्थिती
गावातील पाण्याची टाकी स्वच्छ करण्यात आली व चौदाव्या वित्त आयोगाच्या निधीचा वापर नवीन विकास काम केले जाणार आहेत, कार्यकाळ संपल्याने 14 वर्षापासून भोंगा बंद पडला. गावातल्या ग्रामपंचायतीच्या हद्दीतील जिर्ण व सुकलेली झाडांची पाच मण लाकडे ग्रामपंचायततर्फे गावातल्या मयत माणसाच्या अंत्यसंस्कारासाठी देण्यात यावी या विषयाला ठराव करण्यात आले. यावेळी उपसरपंच हर्षल पवार, ग्रा.पं.सदस्या शितल पाटिल रेखा पाटील, कविता यादव, सदस्य ऋषिकेश पवार, सोपान लोहार, सागर मोरे, गजानन बिरारी, रवींद्र पारधी, आंगणवाडी सेविका, माजी सरपंच सुनिल गुलाबराव पवार, विनोद पवार, महेंद्र पाटील, किशोर पाटील, घनश्याम पाटील, दादा पवार, विवेक पवार, भूषण देवरे, विशाल पाटील, दिलीप बोरसे, मंगेश पवार आदी उपस्थित होते.