पातोंडा सरपंचपदी शितल पवार यांची बिनविरोध निवड

0

अमळनेर । तालुक्यातील पातोंडा येथे झालेल्या ग्रामपंचायत सरपंच पदाच्या फेरनिवडीत नम्रता पॅनलच्या शितल विनोद पवार यांची बिनविरोध निवड झाली. या आधी ऑगस्ट 2015 मधे झालेल्या ग्रामपंचायत नवडणूकीत तीन उमेदवार बिनविरोध निवडले होते व उर्वरीत दहा जागांमधे झालेल्या सरळ लढतीत विनायक बिरारी, सुनिल पवार व जितेंद्र पवार यांच्या नेतृत्वाखालील नम्रता पॅनलच्या सहा जागांवर विजय मिळाला व परीवर्तन पॅनलला चार जागांवर समाधान मानावे लागले होते. नम्रता पॅनलमधे बंडखोरी झाल्याने परीवर्तन पॅनलच्या मनिषा प्रविण बिरारी यांना सात मते तर नम्रता पॅनलच्या शितल पवार यांना पाच मते पडली होती तर एक मत बाद झाले होते.

निवडीसाठी शितल पवार यांचा एकमेव अर्ज
शितल पवार यांचा एकमेव अर्ज असल्याने शितल पवार यांची बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी नाना पाटील यांनी घोषीत केले. याप्रसंगी कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष करत आंनदोत्सव साजरा केला.यावेळी ग्रामविस्तार अधिकारी अंबादास पाटील, तलाठी के.एस.चौधरी यांनी कामकाज पाहिले. यावेळी उपसरपंच हर्षल पवार ग्रा.पं. सदस्य रेखा पाटील, शितल पाटील, कविता यादव, संगिता संदानशिव, रिता पारधी, ग्रा.पं.सदस्य ऋषिकेश पवार, सोपान लोहार, भुरा संदानशिव, सागर मोरे, गजानन बिरारी तसेच माजी सरपंच व पॅनल प्रमुख सुनिल गुलाबराव पवार, उपसरपंच संदिपराव पवार, जितेंद्र पवार, किशोर पाटील आदी उपस्थित होते.