पातोंडीच्या विवाहितेची विहिरीत उडी घेवून आत्महत्या

0

रावेर- तालुक्यातील पातोंडी येथील 32 वर्षीय विवाहितेने गावठाण परीसरातील विहिरीत उडी घेवून आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण मात्र कळू शकले नाही. नंदाबाई गणेश मोरे (32, पातोंडी) असे मयत विवाहितेचे नाव आहे. पातोंडी गावातील गावठाण परीसरात ग्रामपंचायतीच्या विहिरीत शुक्रवारी सकाळी सात वाजेच्या सुमारास विवाहितेचा मृतदेह आढळला. पातोंडी पोलीस पाटील रवींद्र दगडू लवंगे यांनी रावेर पोलिसात दिलेल्या खबरीनुसार अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास हवालदार संतोष चौधरी करीत आहेत.