वाकड : पायी जात असलेल्या तरुणाला दुचाकीवरुन आलेल्या तीन अज्ञातांनी लुटले. हा प्रकार देहूरोड-कात्रज बायपास रोडवर बालेवाडी स्टेडीयमच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ जवळ शनिवारी (दि. 16) रात्री एकच्या सुमारास घडला. पलाष विवेक चिंचोळीकर (वय 25, रा. ब्ल्यू रिज टॉवर नं. 9, आयटी पार्क, फेज 1, हिंजवडी. मूळ रा. इंदोर, मध्य प्रदेश) या तरुणाने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पलाष शनिवारी बालेवाडी स्टेडीयमच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळून जात होता. त्यावेळी एका दुचाकीवरुन आलेल्या तिघांनी त्याला अडवून हाताने, लोखंडी रॉडने मारहाण करत त्याच्याजवळील एक मोबाईल, बूट, एटीएम कार्ड घेतले. नंतर ठार मारण्याची धमकी देऊन एटीएमचा पासवर्ड घेऊन 9 हजार 200 रुपये काढले. यावरुन गुन्हा नोंदविण्यात आला आहे.