धुळे। तालुक्यातील लामकानी येथील पान नदीवर जलयुक्त शिवार अभियानतून मंजूर करण्यात आलेल्या साठवण बंधारा क्रमांक तीनची सकाळी 11 वाजता धुळे ग्रामीणचे माजी आमदार प्रा.शरद पाटील यांच्या हस्ते पायाभरणी करण्यात आली. जलयुक्त शिवार अभियनातून 2016-17 च्या योजनेतून हा बंधारा मंजूर करण्यात आला होता. याप्रसंगी शिवसेनेचे जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष सुधीर जाधव, जलतज्ञ डॉ.धनंजय नेवाडकर, शिवसेना तालुका संघटक परशुराम देवरे, लामकानी सरपंच नाना पाटील, उपसरपंच धनंजय कुवर, ज्येष्ठ शिवसैनिक एकनाथ मिस्तरी, बेहडचे सरपंच रावसाहेब गिरासे पहिलवान, सैताळ्याचे सरपंच बापू राजाराम पाटील, लामकानीचे माजी सरपंच किशोर चौधरी, ज्येष्ठ ग्रामस्थ नरहर आण्णा येवले, पंचायत समिती सदस्य दिपक शिरुडे, भाईदास तेले, गुलाब धनगर, वाघ आण्णा, वनसिंग राजपूत, विठोबा पाकळे, सुनील तलवारे, शानाभाऊ सासके, डॉ.बी.झेड.ठाकूर, लखन पाटील, गोपीचंद तेले, लखन वाडीले, गणेश बच्छाव, प्रेमलाल जयस्वाल, रघुनाथ धनगर, बबन तात्या गिरासे, प्रकाश धनगर, लाला आमदार, शिवदास माळी, प्रविण तेले, हिरालाल तेले, गटलू भिल, भटू लांडगे यांच्यासह नागरिक व कार्यकर्ते उपस्थित होते.
सदर दोघी बंधार्यांमुळे किमान नदीपात्राच्या दोन्ही बाजूस असणार्या 500 एकर कोरडवाहू शेतीला त्याचा फायदा होणार आहे. याबाबत शेतकर्यांनी समाधान व्यक्त केले आहे. बंधारे मंजूर केल्याबद्दल ग्रामस्थांनी धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे, तत्कालीन जिल्हाधिकारी आण्णासाहेब मिसाळ, माजी आमदार प्रा.शरद पाटील, प्रांताधिकारी गणेश मिसाळ, रोजगार हमीच्या उपजिल्हाधिकारी शुभांगी भारदे, लघुसिंचन जलसंधारण विभागाचे कार्यकारी अभियंता श्री.शिंदे यांचे आभार मानले आहेत.
शेतीला होणार फायदा
त्यापैकी साठवण बंधारा क्रमांक तीन (पान नदी) याची आज रितसर पूजन करुन पायाभरणी करण्यात आली. लामकानी हा माळमाथा परिसर म्हणून ओळखला जातो. आजही लामकानी परिसरात उन्हाळ्यात पाऊस कमी पडल्यास पिण्याच्या पाण्याची टंचाई भासते. त्यामुळे या परिसरात नदीतून वाया जाणारे पाणी अडविल्यास शेतीला फायदा होवू शकतो,अशी धारणा शेतकर्यांची होती. त्यामुळे गावाचे उपसरपंच व सामाजिक कार्यकर्ते धनंजय कुवर यांनी माजी आमदार शरद पाटील यांच्या माध्यमातून जिल्हा प्रशासनाकडे बंधारे मंजूर करण्यासाठी सातत्यपुर्ण प्रयत्न चालविले होते.
जलयुक्त शिवार अभियानातून काम
धुळे ग्रामीणचे माजी आमदार प्रा.शरद पाटील यांनी लामकानी परिसरातील शेतकर्यांच्या निवेदनाच्या केलेल्या मागणीच्या आधारे दि.26 मे 2016 रोजी तत्कालीन जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ व विद्यमान पालकमंत्री दादाजी भुसे यांच्याकडे पान नदीवर तीन साठवण बंधारे बांधावेत अशी मागणी केली होती. या निवेदनाची दखल घेत तत्कालीन जिल्हाधिकार्यांनी स्थानिकस्तर विभागाच्या माध्यमातून सर्वेक्षण करुन सदर बंधारे बांधण्याबाबत संबंधित यंत्रेणेला आदेश दिले होते. यातूनच सदर बंधारे जलयुक्त शिवार अभियानाच्या 10 टक्के नियमित योजनेतून मंजूर करण्यात येवून अनुक्रमे बंधार क्रमांक तीन रुपये 58 लाख 97 हजार 374 व बंधारा क्रमांक चार रुपये 49 लाख 65 हजार 807 असा 1 कोटी 8 लाख 63 हजार किंमतीचे दोन बंधारे मंजूर करण्यात आलेत.