पारगावच्या शेतकर्‍याने कडू कारल्याच्या उत्पन्नातून साधली प्रगती

0

आंबेगाव : शेती व्यवसायाला पाणीपुरवठा करणार्‍या योजना मोठ्या प्रमाणात सुरु झाल्या आहेत. त्यामुळे शेतात ऊस, कांदा, बटाटा, कडधान्य, तरकारी आदी पिके शेतकरी घेऊ लागले. तसेच शेतीवर आधारित जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय व कुक्कुटपालन व्यवसाय शेतकरी करू लागले. उत्पादन जास्त आणि खप कमी अशी समस्या निर्माण झाली. अशाच प्रकारे शेती करून आंबेगाव तालुक्यातील शेतकरी प्रगत झाले आहेत. पारगाव येथील एका शेतकर्‍यांने कडू कारल्याच्या पिक तसेच जोडधंदा शेतीतून उत्पादन वाढविले आहे.

आंबेगाव तालुक्यातील शिंगवे येथील शेतकरी सावकार वाव्हळ यांनी आपल्या 40 गुंठे शेतजमिनीत कारल्याची बाग फुलवून विक्रमी उत्पादन घेऊन निव्वळ नफा 10 लाख रुपये नफा कमविला आहे. वाव्हळ हे दरवर्षी कारली पिकाची शेती करून विक्रमी उत्पादन घेतात. यावर्षी त्यांनी आपल्या 40 गुठ्ठे शेतजमिनीत कारल्याची लागवड करण्याचे ठरविले. त्यांनी शेणखत जमिनीत टाकून टॅक्टरने जमीन रोटारून भूसभुसीत केली. सरी काढून त्यावर मल्चिंग पेपर टाकून आणि पाण्याची बचत व्हावी आणि पिकाला योग्य प्रमाणात पाणी मिळावे यासाठी ठिबक सिंचनाचा वापर करण्याचे ठरविले. अभिजीत जातीच्या रोपाची लागवड करण्यात आली. कारल्याच्या वेली वाढू लागल्याने यासाठी मांडव तयार केला. ठिबक सिंचनाद्वारे औषधे व खते देण्यात आली. दोन महिन्यानंतर कारली तोडणीला सुरुवात करण्यात आली. 20 किलोची पॅकिंग करुन चाकण व पुणे या बाजारपेठेत विक्रीसाठी पाठवण्यात आली. या पिकातून खर्च जाऊन 10 लाख रुपये नफा मिळाला.

पोल्ट्रीच्या कोंबडखताचा वापर
सावकार वाव्हळ हे दरवर्षी कारली व वांग्याचे पिक भरघोस घेतात. जोडधंदा म्हणून त्यांनी कुक्कुटपालन व्यवसाय सुरू केला. त्यांनी पोर्ल्ट्री शेड बांधले. शेतीला पोर्ल्ट्रीमधून शेतासाठी कोंबडखत मिळत असल्याने शेतातील पिकांना चांगल्या प्रकारचा फायदा होत आहे. शेतात कोणती पिके द्यावी व त्याचे व्यवस्थापन कसे करावे. हे शेतकरी सावकार वाव्हळ यांच्याकडून शिकण्यासारखे आहे.