पारोळा तहसिलसमोर काँग्रेसतर्फे ‘रास्ता रोको’

0

जळगाव। पारोळा येथे काँग्रेसतर्फे शेतकरी संपास पाठिंबा म्हणून आज आशिया महामार्ग क्रमांक 46 वर जुने तहसील कार्यालयासमोर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. जिल्हा अध्यक्ष डॉ.संदीप पाटील, प्रदेश सरचिटणीस डी.जी. पाटील, संघटक सुकलाल महाजन, अजबराव पाटील, तालुका अध्यक्ष पिरन अनुष्ठान यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. आंदोलनामुळे महामार्गाच्या दोन्ही बाजूला लांबच लांब रांगा लागल्या होत्या त्यामुळे काही काळ वाहतुक ठप्प झाली होती.

शेकडो शेतकर्‍यांची उपस्थिती
यावेळी आंदोलनकर्त्यांनी आणलेले दूध भाजीपाला रस्त्यावर न टाकता गरीबांना वाटप करण्याचे आवाहन पोलीस निरीक्षक एकनाथ पडाळे यांनी केले. कार्यकर्त्यांनी ही सुचना मान्य करीत भाजीपाला व दूध गरीब लोकांना वाटप केले. यावेळी उमेश पाटील, बापु वाडीले, महिला अध्यक्ष कल्पना वानखेडे, नामदेव महाजन, संजय पाटील, विक्रम पाटील यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.