जळगाव : पारोळा तालुक्यातील मेहु येथे झालेल्या घरफोडी प्रकरणी जळगाव गुन्हे शाखेने तिघांना अटक केली आहे. चोरट्यांनी तक्रारदार योगेश चव्हाण यांच्या घरातून 12 हजारांची रोकड व मोबाईल लांबवला होता. या प्रकरणी पारोळा पोलिसात गुन्हा दाखल होता. या प्रकरणी कृष्णा अभिमन वाघ (भील), विशाल जगदीश पाटील, रोहित सुनील पाटील (मेहु, ता.पारोळा) यांना अटक करण्यात आली. आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिल्याने त्यांना पारोळा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
यांनी उघडकीस आणला गुन्हा
जळगाव गुन्हे शाखेचे निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार संदीप पाटील, प्रवीण मांडोळे, नंदलाल दशरथ पाटील, भगवान तुकाराम पाटील, राहुल बैसाणे, सचिन पाटील, तांत्रिक पथकातील संदीप साळवे, ईश्वर पाटील, चालक अशोक पाटील, चालक मुरलीधर बारी आदींच्या पथकाने ही कारवाई केली.