पारोळा येथील राष्ट्रीय महामार्गावर वाहतूकीची कोंडी

0

पारोळा । पारोळा शहरातून जाणार्‍या राष्ट्रीय महामार्गावर आज सकाळी 11 वाजेपासून वाहतूकीची कोंडी झाली आहे. आज रविवार असल्याने पारोळा येथील आठवडा बाजार आणि लग्नाची मोठी तारिख असल्याने गेल्या दीड तासापासून राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक थप्प झाली आहे. त्यामुळे जळगाव कडून धुळेकडे जाणारे आणि धुळ्याकडून जळगावकडे सर्व वाहने एकाच ठिकाणी थांबल्यामुळे प्रवाश्यासह वाहनचालकांचे हाल होत आहे.