पारोळ्याजवळ अपघातात ५ ठार

0

पारोळा । प्रतिनिधी । तालुक्यातील दळवेल गावाजवळ ट्रक व कारच्या अपघातात ५ जण ठार झाले असून ५ जण जखमी झाले आहेत.

याबाबत मिळालेली प्राथमिक माहित अशी की, दळवेल गावाजवळ मारूती इको या कारला समोरून येणार्‍या ट्रकने जोरदार धडक दिली. यात इकोमधील पाच जण जागीच ठार झाले असून इतर ५ जण जखमी झाले आहेत. धुळ्यावरून लग्न लाऊन पाचोरा येथे परतणार्‍या वाणी कुटुंबातील सदस्यांचा मृतांमध्ये समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, जखमींना धुळे येथील जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर याबाबत पारोळा पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

(सविस्तर माहिती लवकरच)