पारोळ्याजवळ ट्रकच्या धडकेत तरूण ठार; वाहनासह ट्रकचालक फरार

0

पारोळा। अज्ञात ट्रकने कारला धडक दिल्याने पारोळ्यातील वर्धमान नगरातील रहिवाशी भूषण शालिग्राम पाटील हा युवक जागीच ठार झाला आहे. एक जण जखमी झाला. हा मध्यरात्री म्हसवे शिवारातील दुर्गा पेट्रोलपंपाजवळ झाला.

अमळनेर तालुक्यातील लोण येथील मुळ रहिवाशी असलेला भूषण पाटील हा आपल्या चारचाकी (एमएच 19-एपी 4592) एरंडोलकडून पारोळ्याकडे येत होते. म्हसवे शिवारात दुर्गा पेट्रोल पंपाजवळ अज्ञात ट्रकने त्यांच्या कारला जोरदार धडक दिली. मागून येणार्‍या ट्रकवर (एमएच 04-सीजी 4496) आदळली. त्यामुळे भूषण पाटील याचा जागीच मृत्यू झाला. अपघातात एक जण जखमी झाला आहे. धडक देणारा ट्रक चालक वाहनासह फरार झाला. याप्रकरणी पारोळा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.