जळगाव: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज भाजपच्या महाजानादेश यात्रेनिमित्त जळगाव जिल्हा दौऱ्यावर आहेत. पारोळा शहरात सध्या महाजानादेश यात्रा सुरु आहे. यावेळी बोलतांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पारोळा येथे माझा स्वागत इतक्या मोठ्या प्रमाणात होईल असे मला अपेक्षित नव्हते, मात्र अपेक्षेपेक्षाही जंगी स्वागत तुम्ही केले असल्याने मी पारोळ्यातील स्वागत आयुष्यभर विसरणार नाही असे सांगितले. यावेळी जलसंपदामंत्री जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन, खासदार उन्मेष पाटील, पारोळ्याचे नगराध्यक्ष करण पवार आदी उपस्थित होते.
पारोळ्यातील पाणी प्रश्न आम्ही सोडविले आहे. कॉंग्रेस-राष्ट्रवादीने आजपर्यंत केले नाही तेवढे काम पाच वर्षात केले असल्याचे सांगत पाच वर्षातील काम तुमच्यापर्यंत पोहोचविण्याचे काम या यात्रेतून करत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. पुन्हा महाराष्ट्रात भाजपचे सरकार आणायचे आहे त्यासाठी तुमचा जनादेश आवश्यक असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.