पारोळा । एक मुस्लिम युवक आपल्या वाहनात गुरांची वाहतूक करीत असताना बजरंग दलाचे कार्यकर्त्यांनी सकाळी 10 वाजता वाहन पकडले आणि यावरून मग मुस्लिम समाजातील युवकांनी व गुरे व्यापार्यांनी थेट पोलीस ठाण्यात धडकत आमच्या वाहनचालकास व एकास मारहाण केल्याचे सांगत, यावरून हिंदू-मुस्लिम युवकात तू-तू मैं-मैं होत वादाची ठिणगी पडली. याच दरम्यान कजगाव चौफुलीवर किरकोळदगड फेक झाली आणि गावात दंगल झाल्याची अफवा वार्या सारखी पसरली सर्वांची धावपळ पळापळ सुरू झाली. बाजारपेठेतील व्यापारी दुकानदारांची धावपळ उडाली, पटापट दुकानदारांनी दुकाने बंद केली, शाळा सुटण्याची वेळ झाली होती पालकांची ही मुलांना शाळेतुन घरी आणण्यासाठी एकच पळापळ उडाली. यावेळी पोलिस निरीक्षक एकनाथ पाडळे यांनी परिस्थिती लक्षात घेऊन कुरेशी मोहल्ला येथे सर्व पोलिसांना पाचारण करण्यात आले. व जमावाला शांत करण्याचा प्रयत्न केला या वेळी आमदार डॉ सतीश पाटील यांना गावात झालेला प्रकार समजताच त्यांनी दुचाकी ने बाजारपेठेतुन व्यापारी युवक दुकानदारांना शांततेचे आहवान करीत दुकाने सुरू करा असे सांगत थेट कुरेशी मोहहला गाठला तेथे जमा झालेल्या मुस्लिम युवकांना समजावले आणि शांतता राखनाचे आहवान केले व कायदा कोणी ही हातात घेऊ नये शांततेला गालबोट लागेल असे कोणी वागू नये अन्यथा त्याची गय केली जाणार नाही असे आमदार डॉ. पाटील यांनी सांगितले, या वेळी मुस्लिम समाजातील नेत्याचे म्हणणे ऐकून सर्व जण बसून चर्चा करू असे सांगितले.