पारोळ्यात धाडसी घरफोडी, लाखाची रोकड लंपास

0
पारोळा:- शहरातील शिवाजी नगरातील रहिवासी धनश्री मेडिकल व ड्रेसेसचे मालक जगदीश शिवाजी आफ्रे यांच्या बंद घरातून चोरट्यांनी लाखाची रोकडसह अन्य मुद्देमाल लंपास केल्याची घटना 21 रोजी सकाळी उघडकीस आली. आफ्रे हे  पत्नी अ‍ॅड.कृतिका आफ्रे यांच्यासह लग्नासाठी सुरत येथे गेल्याने घराला कुलूप असल्याची संधी चोरट्याने साधली. 21 रोजी सकाळी 10:30 वाजेच्या सुमारास शहरातील सोमनाथ टोळकर हे अ‍ॅड.कृतिका आफ्रे यांना न्यायालयाच्या कामासाठी त्यांच्या घरी भेटण्यासाठी गेल्यानंतर त्यांना घराचा दरवाजा उघडा दिसल्याने चोरी झाल्याचे लक्षात आले. चेतन भरत पवार यांनी या प्रकरणी पारोळा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली.