पारोळा : वाहतूक नियंत्रण कक्षाच्या कर्मचार्यासोबत हुज्जत घालणार्या पिता-पूत्रांसह तिघांविरोधात पारोळा पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला. मंगळवारी सकाळी 11.30 वाजेच्या सुमारास शहरातील कजगाव नाका व पारोळा पोलिस ठाण्याच्या आवारात ही घटना घडली.
तिघांविरोधात गुन्हा दाखल
पारोळा येथील चोरवड नाक्याजवळ भाजीपाला विक्रेत्याने रहदारीच्या मार्गावर आपले कॅरेट ठेवल्याने पारोळा पोलिस ठाण्याचे वाहतूक नियंत्रण शाखेतील कर्मचारी दीपक साहेबराव अहिरे (35) यांनी गस्तीदरम्यान भाजीपाला विक्रेता चंद्रकांत पाटील याला ते मागे घेण्यास सांगितले मात्र संबंधिताने कॅरेट मागे घेण्यास नकार देत यापूर्वी माझ्यावर तीन केसेस झाल्याने तुमच्याने जे होईल ते करून घ्या, अशी धमकी दिली तसेच भाजी कापण्याच्या चाकूने उजव्या डोळ्याखाली मारून दुखापत केली व तुम्हा पोलिसांना कामाला लावतो, पोलिस अधीक्षकांकडे तक्रार करतो, अशी धमकीही दिली तर अन्य दोन आरोपींनी संशयीतांला पोलिस ठाण्यात आणल्यानंतर आरडा-ओरड करीत संशयीताला पोलिस ठाण्यातून पळवून नेण्याचा प्रयत्न करीत शासकीय कामाकत अडथळा आणला. हा सर्व प्रकार मंगळवार, 26 रोजी सकाळी 11.30 वाजता घडला. या अनुषंगाने दीपक अहिरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चंद्रकांत सुदाम पाटील (22), सुदाम अशोक पाटील (46) व सुनील अशोक पाटील (38, सर्व रा.सुदर्शन नगर, पारोळा) यांच्यावर शासकीय कामकाजात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल झाला. पुढील तपास उपनिरीक्षक राजू ताधव करीत आहेत.