पारोळ्यात संशयास्पदपणे फिरणार्‍या मध्यप्रदेशातील 11 जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई

पारोळा : शहरात संशयास्पदपणे फिरणार्‍यावर मध्यप्रदेशातील 11 संशयीतांवर पारोळा पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई केली.

भर दिवसा संशयास्पदरीत्या फिरताना कारवाई
शहरासह तालुक्यात अलिकडच्या काळात चोर्‍यांचे प्रमाण वाढले असून तीन दिवसांपूर्वी भर दिवसा दोन चोर्‍या झाल्याने नागरीकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासनाने सतर्कता बाळगली आहे. दरम्यान, भर दिवसा बुधवारी दुपारी शहरातून काही जण संशयास्पदरीत्या फिरतांना पोलिसांना आढळून आले. त्यांची विचारपूस केली असता त्या सर्वांनी उडवा-उडवीची उत्तरे दिल्याने त्यांना ताब्यात घेण्यात आले.

11 जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई
पारोळा पोलिसांनी गणेश शंकर चव्हाण (26, रा.कसबे, ता.जामनेर), दादाराव किसन चितोडे (रा.अंबड, जि.जालना), काज्या अनाज्या वासकले, तेवज्या बाक्या वासले, कमल दुकान्या वासले, राण्या रामसिंग वासले, अनिल कटुल्या वासले (रा.सर्व रा.रसमल, ता.पाटी, जि.बडवानी), संजय गुलाब शेमले (रा.गोलपाणी, ता.पाटी, जि.बडवानी), सोहज्या रामसिंग वासले आणि दिनेश सुकलाल वासले या 11 जणांना ताब्यात घेतले. सर्वांवर कलम 109 प्रमाणे प्रतिबंधक कारवाई करून सर्वांना तहसीलदार गवांदे यांच्यासमोर हजर करण्यात आले. या सर्व संशयीतांची माहिती त्यांच्या राहत्या पत्त्यावरील पोलिस स्टेशनला कळवण्यात आली असून त्यांचे गुन्हेगारी रेकॉर्ड मागवण्यात आले आहे. या तपासातून त्यांचा अलीकडच्या काळातील गुन्हेगारी कृत्यांमध्ये हात आहे का ? याची माहिती मिळण्यास मदत होणार आहे.

यांनी केली कारवाई
ही कारवाई पोलिस निरीक्षक रामदास वाकोडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. पोलिस निरीक्षक रवींद्र बागुल, उपनिरीक्षक राजू जाधव, हेड कॉन्स्टेबल महेंद्र मराठे, ईकबाल शेख, जावेद शेख, संदीप सातपुते, किशोर भोई, अभिजीत पाटील व आशिष गायकवाड यांच्या पथकाने केली.