पारोळ्यासह चोपड्यातील आठ विद्यार्थी डीबार

0
इतिहासासह रसायनशास्त्र विषयाला केली कॉपी
जळगाव:- कॉपी मुक्त अभियानाचा जिल्ह्यात एकीकडे बोजवारा उडाला असताना दुसरीकडे कॉपी बहाद्दरांवर कारवाईचा धडाका भरारी पथकांनी सुरू ठेवला आहे. बुधवारी पारोळ्यासह चोपड्यात आठ विद्यार्थ्यांना डीबार करण्यात आल्याने कॉपी बहाद्दरांमध्ये खळबळ उडाली.
पारोळ्याच्या किसन महाविद्यालयात दोन तर एनईएस हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयातील चार विद्यार्थ्यांवर डाएटचे प्राचार्य डॉ.गजानन पाटील यांच्या पथकाने रसायनशास्त्राच्या पेपराला कॉपी करताना कारवाई केली तर दुपार सत्रात पारोळा तालुक्यातील तामसवाडी येथील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात इतिहासाच्या विषयाला कॉपी करताना एकास डॉ.गजानन पाटील यांनी डीबार केले तसेच चोपड्यातील बालमोहन उच्च माध्यमिक विद्यालयासह कला, वाणिज्य व विज्ञान महविद्यालयात विद्यार्थ्यास कॉपी करताना राज्य मंडळ सदस्य प्रा.शुभांगी दिनेश राठी यांनी डीबार केले.