जळगाव : महापालिकेच्या प्रशासकीय इमारतीच्या पार्कींगमध्य अतिक्रमण विभागातर्फे जप्त करण्यात आलेले साहित्य ठेवण्यात आले होते. हे साहित्य स्थलांतरीत करण्याबाबत काल प्रभारी आयुक्त किशोर राजे निंबाळकर यांनी आदेश दिले होते. यानुसार हे साहित्य, लोटगाड्या आज महापालिकेच्या मालकीचे बालगंधर्व खुल्या नाट्यगृहाच्या गोडावूनमध्ये स्थलांतरीत करण्यात आले.
सकाळी 7 वाजता स्थलांतरास सुरूवात
पंधरा दिवसापूर्वी मनपाच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने मुख्य रस्त्यावरील हॉकर्सचे अतिक्रमण काढण्याची मोहिम सुरू केली. या मोहिमेत जप्त सुमारे 15 लाख रुपयेपर्यंतचा माल व साहित्य जप्त केले होते. तर जप्त केले साहित्यांचा भंगारखाना महापालिकेच्या प्रशासकीय इमारतीच्या पार्किंगच्या जागेवर ठेवला होता. याबाबत आयुक्तांनी दखल घेत सर्व साहित्य आज बालंगर्धव नाट्यगृहाच्या गोडावूनमध्ये हलविण्यात आले. जिल्हाधिकारी तथा प्रभारी आयुक्त किशोर राजे निंबाळकर हे सकाळी 7 वाजता येवून जप्त साहित्य संस्थालतर करण्याबाबत उपायुक्त लक्ष्मीकांत कहार, मनपा आरोग्य अधिकारी उदय पाटील, अतिक्रमण निर्मूलन अधीक्षक एच.एम.खाना सुचना दिल्या. यानुसार सकाळी दहा वाजेपर्यंत सर्व साहित्य हलविण्यात आले तर पार्किंगच्या जागेची स्वच्छता करण्यात आली.