पोहताना घडली दुर्दैवी घटना ; तालुका पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद
भुसावळ- पार्टीसाठी सहकारी चालक व वाहकांसोबत आलेल्या जळगाव आगारातील चालकाचा वाघूर धरणावर पोहताना बुडाल्याने मृत्यू झाल्याची घटना रविवारी सकाळी नऊ वाजेपूर्वी उघडकीस आली. सचिन नामदेव सपकाळे (32, कल्याणी नगर, दादावाडी, जळगाव) असे मृत चालकाचे नाव आहे. याबाबत सुधीर नामदेव सपकाळे यांनी तालुका पोलिसात दिलेल्या खबरीनुसार अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास एएसआय अरुण जाधव करीत आहेत.