भुसावळ: रेल्वे स्थानकाचा विस्तार सुरू असल्याने बुकींग कार्यालयानजीक असलेले रेल्वेचे पार्सल कार्यालय रंग भवनाजवळील व अकौंट कार्यालयासमोर स्थलांतरीत करण्यात आले आहे. गुरुवारी चीफ पार्सल अधिकारी अनिल तायडे यांच्या हस्ते या कार्यालयात कामकाजाला प्रारंभ करण्यात आला. डीआरएम आर.के.यादव, सिनी.डीसीएम सुनील मिश्रा, सिनी.डीईएन आर.के.तोमर, मंडल वाणिज्य निरीक्षक एस.एम.कडूस्कर, भुसावळ वाणिज्य निरीक्षक सुदर्शन पांडे, मुख्य वाणिज्य निरीक्षक जीवन चौधरी व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.