अधिष्टाता डी.एन.खैरे ; वरणगाव शहरात अपंग बांधवांचा मेळावा उत्साहात
भुसावळ- वरणगाव शहरातील अपंग बांधवांना शासनाच्या विविध योजनांचा पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या संकल्पनेतून व दूरदृष्टीतून लाभ मिळवून दिला जाईल तसेच अपंग बांधवांना कोणताही त्रास होणार नाही याची काळजी आरोग्य प्रशासन घेत आहे. अपंग बांधवांनी आपले रजिस्ट्रेशन, नाव नोंदणी शासकीय महाविद्यालय, जळगाव येथे करून ऑनलाईन प्रमाणपत्र घ्यावी व शहरातील अपंग बांधवांसाठी बुधवारी सेवा देण्याचे आश्वासन शासकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डी.एन.खैरे यांनी येथे केले. शहर व परीसरातील अपंग बांधवांसाठी नगराध्यक्ष सुनील काळे यांच्या वतीने मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी खैरे बोलत होते.
यांची मेळाव्यास उपस्थिती
नगरपालिकेचे सुनील काळे, उपनगराध्यक्ष शेख अखलाख शेख युसूफ, माजी सभापती राजेंद्र गुरचळ, समाज कल्याण अधिकारी भरत पाटील, एस.टी.महामंडळाचे डीटीओ एन.एस.घुले, आर.पी.चौधरी यांच्यासह नगरसेविका अरणा इंगळे, नगरसेविका वैशाली देशमुख, कामगार नेते मिलिंद मेढे, माजी उपसरपंच साजीद कुरेशी, समाजसेवक इरफानभाई पिंजारी, भाजपाचे नेते अलाउद्दीन सेठ, ग्रामपंचायतीचे माजी सदस्य अजय पाटील, ज्ञानेश्वर घाटोळे , शामराव धनगर, भाजपा शहरप्रमुख सुनील माळी, संजय जैन, आकाश निमकर आदींची उपस्थिती होती.
विविध योजनांचा मिळणार लाभ
समाज कल्याण विभागाचे अधिकारी भरत पाटील यांनी अपंग बांधवांसाठी मिळणारी पास जिल्हा परीषदेच्या माध्यमातून आपल्याला उपलब्ध करून दिली जाईल तसेच महाराष्ट्र सरकार अपंगांच्या विविध योजना राबवण्याचे काम करत आहे, असे यावेळी समाज कल्याण अधिकारी भरत पाटील यांनी सांगितले.सर्व अपंग बांधवांनी या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी केले. वरणगाव शहरातील 300 अपंग बांधव उपस्थित होते. अपंग बांधवांची नाव नोंदणी यावेळी करण्यात आली.
घरकुलासह अन्य लाभ देणार -नगराध्यक्ष
अपंग बांधवांना नगरपरीषदेच्यावतीने घरकुल व पाच टक्के निधीतून योग्य ते लाभ लवकरच देण्यात येईल, असे ठोस आश्वासन नगराध्यक्ष सुनील काळे यांनी दिले. युडायस नोंदणी वरणगावातच केली जाईल , असेही त्यांनी सांगत रेल्वे विभागाच्या सवलत पासेस, बँकेच्या समस्या मार्गी लावण्याचे त्यांनी दिले.
यांनी घेतले परीश्रम
कार्यक्रम यशस्वीतेसाठी अपंग दिव्यांग मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष विवेक शिवरामे सोहिल कुरेशी, रहेमान शहा, ईरफान भाई व अपंग बांधवांनी परीश्रम घेतले. सूत्रसंचालन ग्रामपंचायत माजी सदस्य अजय पाटील यांनी तर आभार ग्रामपंचायतीचे माजी सदस्य ज्ञानेश्वर घाटोळे यांनी मानले.