पालकमंत्र्याचे शहराच्या विकास कामांकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष

0

जळगाव । शहराचा विकासाकरिता महापालिकेकडून दिवसेंदिवस विविध माध्यामातून विकास कामे करण्यात येत आहेत. परंतु, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची जळगाव जिल्ह्याच्या विकासाकडे दुर्लक्ष होत आहे. महापालिकेच्या विकासाकडे लक्ष देण्याकडे त्यांना वेळ नाही. मंत्रालयात चार महिन्यांपासून अमृत योजना संदर्भातील वर्क ऑर्डर, रस्ते दुरस्तीकरणातील कामे इ.विषय अडकवून ठेवले आहे. यामुळे या सर्व कामांकडे पालकमंत्र्यांचे हेतुपुरस्सर दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप महापौर ललित कोल्हे यांनी पत्रकार परिषदेत केला. महापौर ललित कोल्हे यांनी वारंवार रास्त्यांसंदर्भात समस्या, अमृत विषयी समस्या तसेच शहर विकासासाठी वेळोवेळी पत्रव्यवहार केला. परंतु, महसुल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी या पत्रव्यवहारांना अजिबात लक्ष दिले नाही असा आरोप केला. त्यांनी त्यांची राज्यपातळीवरचे राजकारण दुर ठेवावे. जळगाव जिल्हा व जळगाव शहराच्या विकासासाठी लक्ष घालावे अशी अपेक्षा महापौर कोल्हे यांनी केला.

खड्डे, रस्ते दुरस्तीसाठी निधी दिला नाही
राजकारणामुळे जळगाव शहराचा विकास खुंटला आहे, असा आरोप त्यांनी केला. वारंवार मंत्रालयात जावून ही अमृत योजना संदर्भात कुठलीही दखल घेतली जात नाही, याचे कारण काय असा प्रश्‍न उपस्थित केला. महापालिकेत आकृती बंध, इंजिनिअर असे विविध पदे रिक्त आहे, वारंवार पदे भरण्याच्या पत्रव्यवहार करण्यात येतो, परंतु पालकमंत्री या नात्याने याकडे लक्ष का दिले जात नाही. आजपर्यंत शहराच्या विकासात त्यांचा शुन्य वाटा आहे असा ही आरोप यावेळी महापौर ललित कोल्हे यांनी केला. खड्डे व रस्ते दुरस्तीसाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी 10 कोटींचा निधी देण्याचे मान्य केले होते. मात्र, याबाबत कुठलाही निर्णय घेण्यात आला नाही. कोल्हापुर सारखा विकास जळगावचा करायला हवा. पालकमंत्री जळगावचे विकास कोल्हापुरचा अशा प्रकारे विकासकामांची राजकीय खेळी सद्या सुरू आहे. जळगावच्या नागरिकांना जळगाव शहराचा विकास महत्त्वाचा आहे.