पालकांनी आपल्या मुलांकडे लक्ष द्यावे

0

आकुर्डी शैक्षणिक संकुलाचे संचालक कर्नल (नि) एस. के. जोशी यांचे मत

पिंपरी-चिंचवड : विद्यार्थ्यांचा खर्‍या अर्थाने विकास घडवून आणयचा असेल तर पालक व शिक्षक यांच्यात योग्य समन्वय असला पाहिजे. पालकांनी आपल्या मुलांकडे अधिक लक्ष दिले पाहिजे. आपली मुले काय करतात, त्यांच्या अपेक्षा तसेच आवडी-निवडी काय आहेत, याची माहिती पालकांना असायला हवी, असे मत आकुर्डी शैक्षणिक संकुलाचे संचालक कर्नल (नि) एस. के. जोशी यांनी व्यक्त केले. आकुर्डी येथील डॉ. डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ नुकताच पार पडला. या कार्यक्रमात मनोगत व्यक्त करताना जोशी बोलत होते.

यांची होती उपस्थिती
यावेळी आकुर्डी शैक्षणिक संकुलाचे संचालक कर्नल (नि) एस. के. जोशी, प्राचार्य डॉ. नीरज व्यवहारे, ट्युराकॉज हेल्थकेअर कंपनीच्या व्यवस्थापिका सुनीता गडाले आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.

गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
या कार्यक्रमात डॉ. शिल्पा चौधरी यांनी ‘शिस्तपालन व अभ्यासक्रम’ या विषयी माहिती दिली. प्रा. वैभव वैद्य यांनी कॉलेजच्या विविध उपक्रमांची माहिती दिली. गेल्या वर्षी गुणवंत ठरलेल्या विद्यार्थ्यांचा याप्रसंगी सन्मान करण्यात आला. सर्व विद्यार्थ्यांनी स्वच्छ भारत अभियानाची शपथ घेतली. प्रज्ञा गिग्गू व अभिषेक स्वामी यांनी सूत्रसंचालन केले. तर आभार आकांक्षा सहाय यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा. मुकेश मोहिते, युगल ओसवाल, प्राजक्ता काळे, अश्विनी इष्टे,प्रियांका जाधव, श्रीराम पाटील, दिपाली मोघे यांनी विशेष परिश्रम घेतले.