जळगाव । येथील इंडियन मेडिकल असोसिएशन तर्फे गुणवंत विद्यार्थी सत्कार व नुतनीकरण केलेल्या आयएमए सभागृहाचा उद्घाटन सोहळा थाटात संपन्न झाला. डॉ.जे.जी.पंडीत आयएमए हाऊस मध्ये झालेल्या सोहळ्यास प्रमुख अतिथी म्हणून जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, माजी खा.डॉ.उल्हास पाटील आणि अध्यक्ष डॉ.विश्वेश अग्रवाल, सचिव डॉ.राजेश पाटील यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.
जिल्हाधिकार्यांचा संवाद
जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी चर्चेव्दारे विद्यार्थी व पालकांसमवेत संवाद साधला. त्यांनी जीवनात यशस्वी होण्यासाठी ध्येयनिश्चित करा. शरिर व मन एकत्र ठेवा. वेळेचे व्यवस्थापन करुन एकाग्रता बाळगा. एकांतात स्वयंअध्ययन करा. पालकांनी विद्यार्थ्यांना निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य द्यावे. अपेक्षांचे ओझे लादू नका. सर्वोत्तम कामगिरीचा ध्यास घ्या अशा टिप्स देत स्पर्धा परिक्षांविषयी सुध्दा माहिती दिली.
विद्यार्थी, पालकांचा गौरव
आयुषी पायधन, सारस किनगे, आदित जैन या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. डॉ.विश्वेश अग्रवाल यांनी 1997 ते 2017 तब्बल 20 वर्षांनंतर सभागृहाचे नुतनीकरण करण्यात आले असून अतीशय सुंदर, देखणे रुपांतर होवून वातानुकुलीत व प्रसन्न वातावरण निर्माण झाले असल्याचे त्यांनी सांगितले. सूत्रसंचालन डॉ.रेणूका चव्हाण व लीना पाटील यांनी केले. सचिव डॉ.राजेश पाटील यांनी आभार प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी पुढील आयुष्यात अशाच प्रकारे आपल्या आई, वडिलांचे व गावाचे नाव सातासमुद्रापार न्यावे असे आवाहन केले. कार्यक्रमास आयएमए सदस्यांची सहकुटुंब मोठ्या संख्येने उपस्थित होती.
विध्यार्थी, पालकांचा गौरव
आयुषी पायधन, विराज मुळीक, आदित्य देशमुख, आश्विन गाजरे, ईशा पिपरिया, अपूर्व सरोदे, किर्ती महाजन, आदित्य उपाध्ये, सारस किनगे, आदित जैन, निहारिका भिरुड, मधुरा उभाड पाटील, सुनील पाटील, शिवानी दातार, उत्कर्ष भालोदे, जान्हवी पाटील, आर्यन महाजन, स्वराज पाटील, विराज पाटील, आदी गुणवंत विद्यार्थ्यांचा व पालकांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. आर्किटेक्ट सुचेता कोल्हे व डॉ.जितेंद्र कोल्हे यांचा सभागृहाच्या नुतनीकरणाबद्दल कौतुक करण्यात आले. डॉ.पंकज पाटील, डॉ.राजेश डाबी, डॉ.सुनिल गाजरे, डॉ.शिवराज मुळीक, डॉ.नंदन माहेश्वरी यांचा देणगीदार म्हणून सत्कार करण्यात आला.