पालकांसाठी कार्यशाळा

0

पिंपरी : किडझी यमुनानगर, व रिफ्लेक्शनस् कौन्सिलींग सेंटर यांच्या वतीने आयोजित लहान मुलांचे लैंगिक शोषण होवू नये या कार्यशाळेला पालकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. निगडी येथे झालेल्या या कार्यशाळेत सेंटरच्या तज्ज्ञ आशा रामदासी, अश्‍विनी पंडित आणि शिवानी कुलकर्णी यांनी मार्गदर्शन केले.

आजच्या माहिती तंत्रज्ञान युगामध्ये पालकांनी मुलांवर होणार्‍या शारीरिक व लैंगिक शोषणाबद्दल कसे सतर्क रहावे. ते टाळण्यासाठी काय उपाययोजना कराव्यात याबद्दल माहिती दिली. तसेच पालकांच्या विविध प्रश्‍न व शंकांचे निरसन केले. हेमंत केळकर म्हणाले, मुलांचे शारीरिक व लैंगिक शोषण ही अत्यंत चिंताजनक बाब आहे. या विषयाची माहिती लोकांपर्यंत पोचवावी यासाठी कार्यशाळेचे आयोजन केले होते. के.के मॅनपावर मैनेजमेंटचे संचालक कानजी चौधरी यांनी आभार मानले.