मुंबई । पालघर घटनेप्रकरणी दोन पोलिसांना निलंबित करण्यात आले असून, हे प्रकरण सीआयडी क्राइमकडे सोपविण्यात आले. सीआयडीचे अधिकारी अतुल कुलकर्णी यांच्या नेतृत्वात तपास करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली.
या प्रकरणातील 9 अल्पवयीन मुलांना सुधारगृहात ठेवण्यात आले आहे, तर 100 पेक्षा जास्त लोकांना अटक केली आहे. सर्व आरोपींना 30 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणातल्या पाच म्होरक्यांनाही अटक करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री म्हणाले की, गेल्या पाच वर्षातही आपल्या राज्यात मॉब लिंचिंग झाले. मुळात ही घटना जिथे घडली तो भाग पालघरपासून 110 किमी अंतरावर आहे. दोन साधू दुर्गम भागातून जात होते. जे गाव अत्यंत दुर्गम भागात आहे तिथे काही अंतरावर दादरा नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशाची हद्द सुरु होते. तिथे साधूंना अडवले गेले, त्यानंतर त्यांना परत पाठवले गेले. तिथे गैरसमजुतीने त्यांच्यावर हल्ला झाला आणि दुर्दैवाने त्यांची हत्या झाली. या परिसरात गेले काही दिवस अशी अफवा आहे तिथे चोर फिरत आहेत. त्या सगळ्या गैरसमजातून हा प्रकार घडला, असेही उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे.
Prev Post
Next Post