पालच्या वृंदावन धाम आश्रमात 27 रोजी गुरुपौर्णिमा महोत्सव

0

रावेर- सदगुरू प.पू.श्री लक्ष्मण चैतन्य बापूजींच्या पदस्पर्शयाने पावन झालेल्या रावेर तालुक्यातील पाल येथील श्री वृंदावन धाम आश्रमात 27 जुलै रोजी अखिल भारतीय चैतन्य साधक परीवारातर्फे गुरुपौर्णिमा महोत्सव साजरा करण्यात येणार आहे. महोत्सवानिमित्त व पूज्य बापूजींच्या समाधी दर्शनासाठी महाराष्ट्रासह मध्यप्रदेश, राजस्थान, पंजाब, उत्तरप्रदेश, उत्तराखंड, गुजराथ अश्या 9 ते 10 राज्यातून 50 हजारांच्या आसपास भाविक दाखल होतात. याकरीता त्यांच्या निवास व्यवस्थेसह भोजन, दर्शन आणि सत्संगाचा लाभ घेण्याकरीता तसेच पार्किंग सुविधा, जल व्यवस्थेच्या तयारीला सुरुवात करण्यात आली आहे. गुरुपौर्णिमेच्या दिवशी पहाटे पाच वाजेपासून श्री हरिधाम मंदिरातस्थित असलेल्या परम पूज्य सदगुरु श्री लक्ष्मण चैतन्य बापूजींच्या समाधी दर्शनला सुरुवात करण्यात येईल. पादुका पूजनानंतर नऊ वाजेपासून आश्रमाचे विद्यमान गादीपति श्रद्धेय संत श्री गोपाल चैतन्य बाबाजी च्या सानिध्यात गुरुदीक्षा तसेच सत्संग अमृताचा लाभ, श्रद्धावचन, महाआरती नंतर महाप्रसादाला सुरुवात करण्यात येईल.