पाल- हिंदू-मुस्लिम एकतेचे प्रतीक असलेले हजरत पीर फतेशाह बाबा यात्रोत्सवानिमित्त रविवारी संध्याकाळी ढोल-ताश्यांच्या गजरात भव्य संदल मिरवणूक काढण्यात आली. यावेळी या मिरवणुकीत पंचकमेठीतर्फे कमील तडवी, सत्तार तडवी, सलिम तडवी, ईस्माईल तडवी, हबीब तडवी, सरफराज तडवी, इतबार तडवी, भुरेखा तडवी, माजी आमदार शिरीष चौधरी, रघुनाथ चव्हाण, नग्राम पवार, देविदास हडपे तसेच ज्येष्ठााचा शाल, श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. सायंकाळी पाच वाजता पीर फतेशाह बाबाच्या दर्ग्यावर चादर व नैवेद्य चढवून यात्रोत्सवाला प्रारंभ करण्यात आला. पीर फतेशाह बाबा यांचा दर्शनासाठी हिंदू-मुस्लिम बांधवांची मोठ्या प्रमाणावर गर्दी असते.