पालिका इमारतीस गड किल्ल्यांची नावे द्या

0

चाळीसगाव येथे सह्याद्री प्रतिष्ठानचे मुख्याधिकारी यांना निवेदन

चाळीसगाव – चाळीसगाव नगरपालिका इमारतीस व सभागृहास गड किल्ल्यांची नावे द्यावीत आशी मागणी सह्याद्री प्रतिष्ठानच्या वतीने 20 डिसेंबर रोजी मुख्याधिकारी, नगराध्यक्ष नगरपरिषद चाळीसगाव यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. निवेदनात म्हटले आहे की पूर्वीच्या काळात या गडकिल्ल्यांवरून त्या-त्या भागातील प्रदेश गावांवर नियंत्रण ठेवले जात असे तसेच त्या भागाचा कारभार देखील या किल्ल्यावरूनच केला जात असायचा याचप्रमाणे आजच्या काळात स्वायत्त संस्था म्हणून नगरपरिषद त्या भागातील गावाचा कारभार पाहते व नागरिकांना सुविधा देते किल्ल्यांवर होणारा कारभार आणि नगरपरिषदेच चालणारा कारभार यात खूप साम्य आहे. म्हणूनच चाळीसगाव नगरपालिका इमारतीस गड किल्ल्याचे नाव द्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी सह्याद्री प्रतिष्ठानचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख दिलीप घोरपडे, शरद पाटील, रवींद्र सूर्यवंशी, निलेश हमालई, अजय जोशी, योगेश शेळके, विनोद शिंपी, गौरव पाटील, सुनील पाटील, जितू वाघ, मुन्ना पगार, गोरख गवळी आदी उपस्थित होते.

-फोटो आहे