भुसावळ। शहरातील विविध शासकीय, निमशासकीय विभागाचे आस्थापना विभाग कैशलेस करण्याचा प्रयत्न महाविद्यालयाच्या डिजिधन जनजागृती टीमने केला आहे. त्याच उद्देशाने नगरपालिकेतील सर्व विभाग कॅशलेस करण्यसाठी भुसावळ नगरपालिका व संत गाडगेबाबा अभियांत्रिकी महविद्यालयाच्या डिजीधन जनजागृती टीमच्या संयुक्त विद्यमाने कैशलेस नगरपालिका मार्गदर्शन शिबिर आयोजित केलेले होते. नगरपालिकेच्या कर्मचारी वर्गाला डिजीधन समन्वयक डॉ. गिरीश कुलकर्णी, सह समन्वयक प्रा.धिरज पाटील यांनी मार्गदर्शन केले.
ऑनलाईन बँकींगबद्दल मार्गदर्शन
मुख्याधिकारी बी.टी.बाविस्कर, नगरसेवक रमेश नागरानी यांची उपस्थिति होती. शासन व वित्तीय संस्थांद्वारा उपलब्ध योजनांची माहिती तसेच डिजिटल व्यवहारात वाढ करण्यासाठी विविध प्रकारच्या योजना नगरपालिकेच्या कर्मचार्यांना डीजीधन समन्वयक डॉ. गिरीष कुलकर्णी यांनी दिल्या. शासनाचे भीम अप्प्स, बैंक कार्ड्स, प्रीपेड कार्ड्स, रुपे कार्ड, ई-वॉलेटचा, पीओएस मशीन, माइक्रो एटीएम, इंटरनेट बँकिंग, क्रेडिट कार्ड, डेबिटकार्डचा विविध प्रणालीमध्ये वापर तसेच यूपीआय आणि यूएसएसडीचा साधारण व्यवहारांत वापर करणे याबाबत महाविद्यालयाच्या डिजिधन जनजागृती टीमने मार्गदर्शन केले आहे. तसेच सर्व व्यवहार करतांना घ्यावयाच्या काळजी व उपाय याबद्दल देखिल मार्गदर्शन केले.
भविष्यात इलेक्ट्रॉनिक किंवा डिजिटल चलन मोठ्या प्रमाणात वापरले जाणार आहे. इलेक्ट्रॉनिक्स वित्तीय व्यवहारांची प्रचंड मोठी बाजारपेठ खुली झालेली असून नगरपालिका विभागात हे फार उपयुक्त ठरेल. डिजीटल इंडिया अंतर्गत येणार्या विविध पारदर्शक सुविधा पालिकेने राबवाव्या. इलेक्ट्रॉनिक चलन पद्धतीला आत्मसात करा, वेळ लागेल पण व्यवहारात महत्वाचे ठरेल असे डॉ.गिरीश कुलकर्णी यांचे प्रतिपादन केले.
पालिकेत लवकरच सुविधा उपलब्ध करणार
नगरपालिकेचे सर्व डिमांड रजिस्टर डिजिटल करा. त्यामुळे कामकाजात तेजी येईल, मनुष्यबळ कमी लागेल तसेच घरपट्टी व इतर कर सुविधा जमा करण्यासाठी कैशलेस उपकरणांची मदत घ्या त्यामुळे पैसा डायरेक्ट पालिकेच्या खात्यात जमा होईल, वेळ कमी लागेल व कर्मचारी सुद्धा तणावमुक्त होतील. जमा झालेला पैसा निधि म्हणून विकास कामांना वापरता येईल असे प्रा.धिरज पाटील यांनी सांगितले. नगरपालिका विभागात लवकरच मोठ्या प्रमाणावर विविध कॅशलेस सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे, कर्मचारी वर्गाने या सर्व सुविधा वापरूनच दैनंदिन व्यवहार करावे असे घोषणा मुख्याधिकारी श्री.बी.टी.बाविस्कर यांनी केली.