भुसावळ- पालिका कामकाजात हस्तक्षेप होत असल्याच्या तक्रारीनंतर माजी आमदार संतोष चौधरींसह जनाधारचे गटनेते उल्हास पगारे व अन्य नगरसेवकांना नोटीस बजावून 7 जुलै रोजी खुलासे सादर करण्याचे आदेश देण्यात आले होते. 7 रोजी उभय नगरसेवक प्रांताधिकार्यांकडे हजर झाल्यानंतर त्यांना 23 रोजी बोलावण्यात आले असून या दिवशी त्यांची लेखी खुलासे घेतले जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. पालिकेच्या कामकाजात हस्तक्षेप करून शासकीय योजना राबवताना अडथळा निर्माण करतात, अशी तक्रार तत्कालीन मुख्याधिकारी बी.टी.बाविस्कर यांनी जिल्हाधिकार्यांकडे केल्यानंतर माजी आमदार चौधरींसह जनआधारच्या नऊ नगरसेवकांना नोटीस बजावण्यात आली होती.