पालिका रुग्णालयातर्फे रविवारी पल्स पोलिओ मोहिम

0

भुसावळ। नगरपालिका रुग्णालयातर्फे रविवार 2 रोजी शहरात पल्स पोलिओ मोहिम राबविण्यात येणार आहे. शहरात ठिकठिकाणी बालकांना पोलिओचा डोस पाजण्यासाठी 78 बुथ लावण्यात येतील. तसेच रेल्वे स्टेशन, बसस्टॅन्ड येथे अहोरात्र 24 तास डोस पाजण्यासाठी बुथ उभारण्यात आले आहे.

शहरात राष्ट्रीय महामार्गावर सायली हॉटेल, वरणगाव रोड, नाहाटा चौफुली, कोणार्क हॉस्पिटल, यावल नाका, पांडूरंग टॉकीज आदी ठिकाणी फिरते पथक, ट्रक, बस, ट्रॅव्हल्स आदी वाहनांतून प्रवास करणार्‍या 0 ते 5 वयोगटातील पालकांना थांबवून पोलिओचा डोस पाजण्यात येणार आहे. तरी आपल्या पाल्यास पोलिओचा डोस पाजण्याचे आवाहन नगराध्यक्ष रमण भोळे, मुख्याधिकारी बी.टी. बाविस्कर यांनी केले आहे. तसेच 2 रोजी डोस न पाजलेल्या बालकास मंगळवार 4 रोजी पासून पुढील पाच दिवस सकाळी 8 ते 5 वाजेपर्यंत घरोेघरी जावून बालकांना डोस पाजण्याची मोहिम राबविण्यात येणार असल्याची माहिती महिला वैद्यकीय अधिकारी डॉ. किर्ती फलटणकर यांनी दिली.