पुणे : महापालिकेत विरोधी पक्षनेतेपदी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे गटनेते दिलीप बराटे यांची मंगळवारी अधिकृतपणे निवड करण्यात आली.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्षपदी निवड झाल्यानंतर चेतन तुपे यांनी राजीनामा दिला. त्यानंतर गटनेतेपदी बराटे यांची निवड झाली. विभागीय आयुक्तांना त्याप्रमाणे पक्षाने पत्र दिले. विभागीय आयुक्तांचे पत्र आल्यावर महापौर मुक्ता टिळक यांनी बराटे यांच्या नांवाची घोषणा केली.
हे देखील वाचा
वारजे प्रभागातून बराटे निवडून आले असून ते माजी उपमहापौरही आहेत. पुण्यातील पाणी आणि वाहतूक हे दोन ज्वलंत प्रश्न आहेत. या प्रश्नांवर शहराचे हित जपण्याचे काम विरोधी पक्षनेता म्हणून मी करेन. मेट्रो प्रकल्प , पीएमपीची बस खरेदी यावरही बारकाईने लक्ष ठेवून सत्ताधाऱ्यांवर अंकुश ठेवू अशी प्रतिक्रिया बराटे यांनी दिली.