प्रभारी नगराध्यक्ष युवराज लोणारी यांचे पत्रकार परीषदेत आवाहन
भुसावळ :- सत्ताधारी व विरोधी नगरसेवकांच्या प्रभागातील विकासात्मक विषयांना शनिवार, 17 रोजी होणार्या सभेत प्राधान्य देण्यात आले आहे, सर्व विषयांवर आमची चर्चा करण्याची तयारी आहे त्यामुळे विरोधकांनी सभेला उपस्थिती द्यावी , असे आवाहन प्रभारी नगराध्यक्ष युवराज लोणारी यांनी पत्रकार परीषदेत केले.
गुरुवारी पालिकेच्या सभागृहात त्यांनी पत्रकार परीषद घेतली. ते म्हणाले की, सर्वच प्रभागातील नगरसेवकांना न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. आगामी सभेत तब्बल 152 विषयांना प्राधान्य देण्यात आले असून विरोधकांनी सभेला हजेरी लावणे गरजेचे आहे. प्रसंगी गटनेता मुन्ना तेली, अॅड.बोधराज चौधरी, महेंद्रसिंग ठाकूर, अमोल इंगळे, देवा वाणी, बापू महाजन, सतीश सपकाळे आदींची उपस्थिती होती.