पिंपरी : महापालिकेच्या क क्षेत्रीय कार्यालयाच्यावतीने स्वच्छ भारत अभियानांंतर्गत मोकळ्या भूखंडांची विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे. या अभियानामध्ये गुरुवारी झालेल्या कारवाईत सुमारे 5.60 टन कचरा उचलण्यात आला. जाधववाडी येथील सीएनजी पंपासमोरील मैदानात राबविण्यात आलेल्या या माहिमेत प्रभाग अध्यक्षा अश्विनी जाधव, अतिरिक्त आयुक्त दिलीप गावडे, क्षेत्रीय अधिकारी अण्णा बोदडे, आरोग्य कार्यकारी अधिकारी मनोज लोणकर, सहाय्यक आरोग्य अधिकारी बी.बी. कांबळे, आर. एम. भोसले, विजय दवाळे, पर्यावरण संवर्धन समितीचे अध्यक्ष विकास पाटील, ज्येष्ठ नागरिक महासंघाचे सूर्यकांत मुथियान, संत निरंकारी चॅरिटेबल ट्रस्टचे डी.एस. नाळे, त्यांच्या स्वंयसेवकांसह सहभागी होते. यामध्ये महानगरपालिकेच्या कर्मचार्यांसह स्वंयसेवी संस्थांचे 123 प्रतिनिधी सहभागी झाले होते.