पालिकेच्या आवारातील नादुरूस्त वाहने, फर्निचर अन्यत्र हलवा ः विलास मडिगेरी

0

पिंपरी चिंचवड ः पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आवारातील नादुरूस्त वाहने आणि टाकाऊ फर्निचर अन्यत्र हलविण्यात यावे, अशी सूचना स्थायी समितीचे सभापती विलास मडिगेरी यांनी आयुक्त श्रावण हार्डीकर यांना केले आहे. यासंदर्भात सभापती मडिगेरी यांनी लिखीत स्वरुपात आयुक्तांना सूचना केली आहे.

त्यांनी म्हटले आहे की, महापालिकेच्या आवारात मनपाची बंद वाहने कित्येक दिवसांपासून उभी असल्याची दिसतात. टाकाऊ फर्निचर देखील अस्ताव्यस्त पडले आहे. पालिकेच्या आवारात पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी यांना वाहने लावण्यासाठी उपलब्ध जागा अपुरी पडत आहे. त्यामुळे ही बंद वाहने आणि टाकाऊ फर्निचर अन्य ठिकाणी हलविण्यात यावे. याबाबत संबंधित विभागप्रमुखांना योग्य निर्देश देण्यात यावेत, अशी सूचना सभापती मडिगेरी यांनी केली आहे.