पालिकेच्या मालकीच्या जुन्या मटन मार्केटची वास्तु जीर्ण झाल्याने अपघाताची शक्यता

0

शहादा। येथील मच्छीबाजारालगत पालिकेच्या मालकिचे जूने मटन मार्केटच्या वास्तू जीर्ण झालेली आहे. कच्चे बांधकाम कधीही पडून दुर्घटना घडू शकते. पालिकेने जीर्ण वास्तू पाडून नविन बांधकाम करून भाड्याने दिल्यास उपन्नाचे साधन सुरू होणार आहे. शहादा नगरपरिषदेने तीस वर्ष अगोदर गोमाई नदी किनारे कुंभार टेकडी लगत मच्छी बाजारा समोर बोकड मटन विक्री केंद्राचे बांधकाम केले होते. शहरातील काही नॉनव्हेज खाणारे लोक येथे मटन खरेदी करीता येत असे. एकच केंद्र असल्याने सकाळ पासून सायंकाळ पयत ग्राहकांची एकच भाऊगर्दी असायची.शहराच्या हळूहळू विस्तार होत गेल्याने मटन मार्केट मधिल दुकानदारांनी स्वतंत्र दुकान थाटली होती.

दहा ते पंधरा वर्षापासून मटन मार्केट बंद
या मार्केटमध्ये दुकानही अल्प दराने दिलेली होती. गेल्या दहा ते पंधरा वर्षापासुन मटन मार्केट बंद पडले आहे. या मार्केटला लागुन रहिवासी राहतात. मार्केटच्या बाजुलाच हजरत सैय्यद शाह वली दरगाह शरीफ यांच्या दरगाह आहे. मुस्लिम बांधव जवळच राहणा-या घरातील लहान लहान मुले उन्हाचा आसरा व खेळण्यासाठी याच ठीकाणी येतात. कधीही जीर्ण बांधकाम पडु शकते. मटन मार्केटची जीर्ण झालेली इमारतींच्या समोरील व डाव्या बाजूची भिंत कोसळली आहे. उभ्या असलेल्या भिंती कधीही पडु शकतात. त्यामुळे दुर्घटना होणार नाही यांची पालिकेने प्रशासनाने खबरदारी घ्यावी. या जागेवर नविन गाळ्यांचे बांधकाम करून बेरोजगार युवकांना किंवा रस्तावर मास विक्री व्यवसाय करणार्याना अल्पदरात गांळे उपलब्ध करून दिल्यास रस्तावर होणारी घाण व दुर्घटना कमी होणार आहे.पालिका प्रशासनाने मटन मार्केटची जुनी जीर्ण झालेली इमारत त्वरित पाडण्याची मागणी तेथील रहिवाशी यांनी केली आहे.

कुभांर टेक भागातील जुने मटन मार्केट जागेच्या सर्व्हे करून गाळे बांधकाम करण्याबाबत प्रशासनस्तरावर निर्णय घेणार

विद्या जमदाळे, नगसेविका