पुणे । हिंदुस्थानच्या स्वातंत्र्य लढ्यात प्रेरणादायी ठरलेले आणि प्रखर राष्ट्राभिमान जागवणारे ‘वंदे मातरम्’ आता पुणे महापालिकेच्या सर्व शाळांमध्ये गायले जावे आणि प्रत्येक शाळेमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचे तैलचित्र बसविण्यात यावे, असा प्रस्ताव शिवसेनेचे नगरसेवक प्रमोद नाना भानगिरे आणि विशाल धनवडे यांनी स्थायी समितीला दिला आहे.
या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर मुंबई पाठोपाठ आता पुणे महापालिकेच्या शाळांमध्ये वंदे मातरम् गायले जाणार आहे. हिंदुस्थानच्या स्वातंत्र्यलढ्यात प्रेरणादायी ठरलेले आणि प्रखर राष्ट्राभिमान जागवणारे ‘वंदे मातरम्’ आता पुणे महापालिकेच्या सर्व शाळांमध्ये गायले जावे. त्याचबरोबर या शाळांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचे तैलचित्र बसविण्यात यावे, असा प्रस्ताव भानगिरे आणि धनवडे यांनी स्थायी समितीला दिला आहे. स्थायी समितीमध्ये हा प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर तो सर्वसाधारण सभेत पाठविण्यात येईल. सर्वसाधारण सभेच्या मंजुरीनंतरच या प्रस्तावाची अंमलबजावणी होणार आहे.