जळगाव । जिल्ह्यातील 12 नगरपालिकांची निवडणूक झाली. नगराध्यक्ष पदांची निवड झाल्यानंतर शुक्रवारी 30 डिसेंबर रोजी उपनगराध्यक्ष तसेच स्वीकृत नगरसेवक पदाची निवड उत्साहात पार पडली. सावदा नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षपदी भाजपच्या नंदाबाई लोखंडे तर स्वीकृत नगरसेवक पदी भाजपचे सतीष बेंडाळे तर रा.कॉ.चे किशोर बेंडाळे यांची निवड, चाळीसगाव नगर परीषदेच्या उपनगराध्यक्षपदी भाजपा पुरस्कृत अपक्ष उमेदवार आशाबाई रमेश चव्हाण यांची वर्णी लागली. भुसावळ उपनगराध्यक्षपदी भाजपाचे युवराज लोणारी बिनविरोध, यावल नगरपालिका उपनगराध्यक्षपदासाठी काँग्रेसच्या शीला सोनवणे एकमेव अर्ज आल्याने बिनविरोध निवड झाली, अमळनेर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षपदी विनोद लांबोळे, रावेर उपनगराध्यक्षपदी सुधिर पाटील यांची बिनविरोध निवड, फैजपुरात काँग्रेसच्या मदतीने भाजपाचा उपनगराध्यक्षपदी हेमराज चौधरी 14 मतांनी विजयी झाल्या. पाचोरा येथे सेनेचे उपगराध्यक्षपदी शरद पाटे, मनिष भोसले यांचा तीन मतांनी पराभव झाला. एरंडोलला उपनगराध्यक्षपदी भाजपचे जाहिरोद्दिन शेख कासम तीन मतांनी विजयी तर स्वीकृत नगरसेवकपदी राष्ट्रवादीचे प्राचार्य डॉ.ए.आर.पाटील तर भाजपचे डॉ.नरेंद्र ठाकुर यांची वर्णी लागली, चोपडा पालिका उपाध्यक्षपदी हितेंद्र देशमुख बिनविरोध, धरणगाव नगरपालिकेत दोन्ही जागा शिवसेनेला मिळाल्या तर उपनगराध्यक्षपदी सुरेखा महाजन यांची निवड झाली. तर पारोळा उपनगराअध्यक्षपदी वर्षा सुधाकर पाटील यांची निवड करण्यात आली. सर्व नगरपालिकासाठी स्वीकृत सभासदांसाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे आपापल्या गटातर्फे जी नावे दिली होती. त्याचे नावे असलेला लिफाफा फोडून त्या नावांची घोषणा देखील नगराध्यक्षांनी केली. यावेळी शिवसेनेने धरणगाव व पाचोरा येथे दोन्ही जागांवर आपले वर्चस्व सिद्ध केले आहे.
अमळनेर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षपदी विनोद लांबोळे
अमळनेर । येथील नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष विनोद लांबोळे तर स्वीकृत नगरसेवक पदी अमळनेर शहर विकास आघाडी शिवसेना व् अपक्ष यांच्याकडून प्रवीण साहेबराव पाटील सलीम शेख फत्तू उर्फ़ शेखा हाजी व अभिषेक पाटील या तीन तर आमदार शिरीष चौधरी मित्र परिवार आघाडीतर्फे प्रा.अशोक पवार यांची निवड लोकनियुक्त नगराध्यक्षा पुष्पलता साहेबराव पाटील यांनी सदरची निवड केली. यावेळी मुख्याधिकारी प्रभाकर सोनवणे प्रशासनाधिकारी भाऊसाहेब देशमुख सभा लिपिक विजय पाटील यांनी मदत केली.सदरची निवड ही 21 डिसेंबर 2016 च्या शासन निर्णयानुसार पिठासनाधिकारी म्हणून लोकनियुक्त नगराध्यक्षा यांची उपनगराध्यक्ष व स्वीकृत सदस्य यांची निवड करण्याचा अधिकार दिले आहेत. चौधरी मित्र परिवार आघाडीचे 10 नगरसेवक अमळनेर शहर विकास आघाडीचे 16 नगरसेवक अपक्ष नगरसेवक 3 शिवसेना नगरसेवक 4 व एक नगरसेवक भाजपा असे एकूण 25 नगरसेवकांना 3 स्वीकृत नगरसेवक घेन्याचे अधिकार होते. त्यानुसार गटनेत्यांनी केलेल्या अर्जावरून व जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर केलेल्या अर्जावरून 5 लोकांची नावे दिली होती. त्यात महावीर पहाड़े यांचे नाव वगळून प्रा. अशोक पवार, प्रविण साहेबराव पाटील, सलीम शेख फत्तू, अभिषेक पाटील यांची निवड करण्यात आली. दरम्यान शिरीष चौधरी आघाडीचे गटनेते व नगरसेवकांनी उपनगराध्यक्ष निवडी प्रसंगी गुप्त मतदान पद्धतीने निवड करण्याची लेखी हरकत घेतली होती. त्यावर पिठासन अधिकारी पुष्पलता पाटील यांनी सदर हरकत फेटाळून हात वर करुन घेण्याचे सांगितले त्यावर सलीमशेख चिरागोद्दीन यांना 10 तर विनोद लांबोळे यांना 25 मते मिळाली तर स्वीकृत नगरसेवक निवडीच्या बाबतीत देखील गट नेता प्रविण पाठक यांनी आरक्षणनुसार निवड व्हावी, असी तोंडी हरकत घेतली.
सर्वांना संधी कशी मिळेल यासाठी आघाडीचे नेते कटिबद्ध
ती हरकत देखील फेटाळली सभागृहात 34 नवनिर्वाचित नगरसेवक उपस्थित होते. यावेळी शहर विकास आघाडीचे प्रनेते अनिल भाईदास पाटील यांनी सांगितले. नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष व 3 स्वीकृत नगरसेवक यांचा विजय म्हणजे अमळनेरच्या जनतेचा विजय होय. यात सक्रिय काम करणारे कार्यकर्ते सर्वपक्षीय नेते पदाधिकारी यांच्यावर जनतेने विश्वास ठेवला म्हणून पुन्हा पाच वर्षात हा आघाडीचा विजय बघायला मिळाला. तालुक्यात खरा इतिहास झाला असेल तर शिवसेना भाजपा कॉग्रेस राष्ट्रवादी कांग्रेस यांच्या माध्यमातुन 25 नगरसेवक प्रचंड मतांनी अमळनेरच्या जनतेने निवडून दिलेत त्यांचे आभार मानले. आघाडीकडे उपनगराध्यक्ष करीता अनेक जण इच्छुक होते. मात्र सर्व नगरसेवकांनी सर्व अधिकार कोअर कमिटिला दिलेला. त्यात शिवसेनेतर्फे व काग्रेसतर्फे नरेंद्र संधानशिव यांना उपनगराध्यक्ष पद दिले पाहिजे असा आग्रह होता. मात्र यात भीष्मपितामहाची भूमिक रामभाऊ संदानशिव व शिवसेनेच्या गट नेत्या संगीता पाटील यांनी शहराच्या विकासासाठी विनोद लांबोळे यांचे नाव पुढे केले. यापुढे सर्वांना संधी कशी मिळेल. यासाठी आघाडीचे सर्व नेते कटिबद्ध आहेत. यावेळी आघाडीचे गोकुळ बोरसे, हेमंत पवार, शिरीष पाटील, शिवसेनेचे संजय कौतिक पाटील, अनंता निकम, विक्रांत पाटील, प्रवीण पाटील, नगरसेवक सुरेश पाटील, अभिषेक पाटील, राजेश पाटील, विवेक पाटील, सचिन पाटील आदि उपस्थित होते.सदर च्या निवडी साठी माजी नगरसेवक मोहन सातपुते, साहेबराव शेजवळ, सुभाष अग्रवाल, पंकज मुंदडे, राजू फापोरेकर, डॉ.राजेंद्र पिंगले, श्याम संदानशिव, अरुण भावसार, डी.एन.महाजन, पांडुरंग महाजन, डॉ.शेलकर, पपु सैनानी, प्रवीण जैन, राजेन्द्र देशमुख, राहुल आहिरराव, सुजीत सराफ
आदी उपस्थित होते.
सावदा उपनगराध्यक्षपदी नंदाबाई लोखंडे यांची बिनविरोध निवड
सावदा । सावदा येथील नगरपालिकेत आज शुक्रवारी 30 डिसेंबर रोजी उपनगराध्यक्ष तसेच स्वीकृत नगरसेवक पदाची निवड करण्यात आली. यावेळी झालेल्या सभेच्या अध्यक्षा तथा पीठासीन अधिकारी म्हणून नगराध्यक्षा अनिता येवले या होत्या. त्या अगोदर सकाळी 9 ते 11 वा दरम्यान मुख्याधिकारी अमोल बागुल यांचेकडे उपनगराध्यक्ष पदासाठी नामनिर्देशन दाखल करण्याची वेळ होती. या वेळेत भाजपातर्फे नंदाबाई मिलिंद लोखंडे यांनी तर राष्ट्रवादी तर्फे प्रभाकर बुला महाजन यांचे अर्ज दाखल झाले. त्यानंतर स्वीकृत सभासदांसाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे दोन्ही गटातर्फे जी नावे दिली होती. त्याचे नावे असलेला लिफाफा फोडून त्या नावांची घोषणा देखील अध्यक्षांनी केली यात भाजपातर्फे सतीष घन:शाम बेंडाळे तर रा.कॉ.तर्फे किशोर सदाशिव बेंडाळे यांची नावे असल्याने या दोघा नावांची घोषणा झाली. किशोर बेंडाळे हे या निवडणुकीत पराभूत झाले होते मात्र रा.कॉ ने स्वीकृत पदी संधी दिल्याने 10 वर्षानंतर त्यांचे पालिका सभागृहात पुनरागमन झाले. तर सतीष बेंडाळे यांची भाजपा तर निवड झाल्याने ते सलग 3 वेळा मागील दरवाजाने पालिकेत नगरसेवक बनले. सकाळी 11 वा नगरपालिका सभागृहात सभेस सुरवात झाली. सभेचे अजेंडा नूतन नगराध्यक्षा अनिता येवले यांनी सभेसमोर वाचून दाखविला यानंतर अर्जमाघारीसाठी 15 मिनिटांची वेळ देण्यात आल.
प्रभाकर महाजन यांनी आपला अर्ज मागे घेतल्याने निवडीचा मार्ग मोकळा
यावेळेत रा.कॉ. गटनेते फिरोजखान नगरसेवक प्रभाकर महाजन तसेच अपक्ष नगरसेवक राजेंद्र चौधरी हे सभागृहाच्या बाहेर गेले व चर्चा केली. राजेंद्र चौधरी हे परत सभागृहात आले त्यानंतर भाजपच्या उमेदवार नंदाबाई ह्या सभागृहां बाहेर गेल्या व त्यानी फिरोजखान व प्रभाकर महाजन यांचेशी चर्चा केली सर्व परत सभागृहात आले यानंतर प्रभाकर महाजन यांनी आपला अर्ज मागे घेतला. त्यामुळे नंदाबाई लोखंडे यांचा मार्ग मोकळा झाला. याचवेळी नगरसेवक राजेश वानखेडे यांनी दोन्ही उमेदवार आपापसात चर्चा करीत आहे. हे चांगले मात्र या बाबत खरी चर्चा दोन्ही गट नेत्यांनी करायला पाहिजे होती अश्या गमतीने प्रतिपादन कल्याने सभेतचे वातावरण आणखीनच खेळीमेळीचे झाले, यानंतर अध्यक्षा अनिता येवले यांनी नंदाबाई लोखंडे यांची उपनगराध्यक्षापदी बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले. त्यामुळे पालिकेत अध्यक्षानंतर उपनगराध्यक्षपदी देखील महिलेस संधी मिळाली पालिकेत सर्वाधिक 11 सदस्या महिला असून अध्यक्ष व उपाध्यक्ष पदी महिलांची वर्णी लागल्याने खर्या अर्थाने पालिकेत आता महिला राज आले आहे. पालिकेत आता 11 महिला व 9 परुष असे एकूण 20 सभासद आहे. या निवडीनंतर सर्वांनी नवनिर्वाचित उपनगराध्यक्ष व स्वीकृत नगरसेवक यांचे स्वागत केले. बाहेर फटाके फोडून व ढोल ताशा व्दारे त्यांचे स्वागत केले गेले. सभेत नंतर मुख्याधिकारी अमोल बागुल यांनी सर्व नवनिर्वाचित अध्यक्ष, उपाध्यक्ष, नगरसेवक यांचे प्रशासनातर्फे सत्कार करण्यात आला. सभेस नवनिर्वाचित सदस्यान पैकी 16 नगरसेवक उपस्थित होते तर नगरसेविका विजया कुशल जावळे या मात्र अनुपस्थित होत्या. तसेच उपनगराध्यक्षपद प्रत्येकी एकवर्षासाठी असल्याचे बोलताना सांगितले. नंदाबाई लोखंडे यांचे रूपाने सावदा पालिकेत प्रथमच उपनगराध्यक्ष पदाचा मान अनुसूचित जातीस मिळण्याचे देखील त्यांनी सांगितले.
चाळीसगावात उपनगराध्यक्षपदी आशाबाई चव्हाण यांची वर्णी
चाळीसगाव । सर्व तालुक्याचे लक्ष लागून असलेल्या चाळीसगाव नगरपरिषद उपनगराध्यक्ष पदी अपक्ष निवडून आलेल्या आशाबाई रमेश चव्हाण यांची वर्णी लागली असून स्वीकृत सदस्य पदी लोकनेते अनिल दादा देशमुख शहर विकास आघाडी कडून माजी नगरसेवक रामचंद्र जाधव तर भाजप कडून माजी नगरसेवक नितीन पाटील व रिपाई चे आनंद खरात यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नगराध्यक्ष आशालता चव्हाण यांनी नगराध्यक्षपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर उपनगराध्यक्ष व स्वीकृत नगरसेवकांची निवड करण्यात आली. उपगराध्यक्षपदासाठी भाजपच्या वतीने नगरसेवक राजेंद्र चौधरी तर भाजप पुरस्कृत अपक्ष उमेदवार आशाबाई चव्हाण यांनी अर्ज दाखल केले होते. लोकनेते अनिलदादा देशमुख शहर विकास आघाडीच्या वतीने नगरसेवक सुरेश स्वार व दीपक पाटील यांचे अर्ज होते. वेळेच्या आत राजेंद्र चौधरी व दीपक पाटील यांनी माघार घेतल्याने उपनगरध्यक्षपदाचे निवड हात उंचावून करण्यात आली. त्यात भाजपचे 13 व शिवसेनेचे विजया पवार व शहर प्रामुकीच तथा नगरसेवक नानाभाऊ कुमावत, अपक्ष उमेदवार सायली जाधव, आशाबाई चव्हाण असे मिळून 17 मते आशाबाई चव्हाण यांना मिळाली तर आघाडीचे सुरेश स्वार यांना 17 मते मिळाली शेवटी नगराध्यक्षांचे 1 मतदान आशाबाई चव्हाण यांना मिळाल्याने त्यांना उपनगराध्यक्ष म्हणून घोषित करण्यात आले.
स्वीकृत नगरसेवकपदी भाजपाच्या कोट्यातून रिपाइंचे खरात
तर स्वीकृत नगरसेवकपदासाठी भाजपतर्फे माजी नगरसेवक नितीन पाटील, रिपाइंचे लोकसभा क्षेत्र प्रमुख आनंद खरात यांची भाजपाच्या कोट्यातून रिपाइंचे स्विकृत नगरसेवकपदी नियुक्ती झाली. प्रशांत पालवे व मनोज चौधरी यांची नावे पुढे आली होती. त्यातील दोघांची नावे कमी होऊन नितीन पाटील व आनंद खरात यांची स्वीकृत नगरसेवक पदी निवड झाल्याची घोषणा करण्यात आली व लोकनेते अनिल दादा देशमुख शविआतर्फे माजी नगरसेवक रामचंद्र जाधव व सुरेश चौधरी यांची नावे देण्यात आली होती. मात्र सुरेश चौधरी यांचा अर्ज अपात्र झाल्याने रामचंद्र जाधव यांची स्वीकृत नगरसेवक पदी निवड झाल्याची घोषणा करण्यात आली. पिठासीन अधिकारी म्हणून नगराध्यक्षा आशालता चव्हाण तर सहायक म्हणून मुख्याधिकारी श्रीकृष्ण भालसिंग यांनी कामकाज पहिले. स्वीकृत नगरसेवक व उपनगराध्यक्ष यांचे आमदार उन्मेष पाटील यांनी अभिनंदन करून वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली तर स्वीकृत नगरसेवक रामचंद्र जाधव यांचे देखील राष्ट्रवादीचे माजी आमदार, नगरसेवक राजीवदादा देशमुख, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अभिनंदन केले आहे.
यावल येथे उपनगराध्यक्षपदी कॉग्रेसच्या शीला सोनवणे
यावल । यावल उपनगराध्यक्ष पदाच्या निवड प्रक्रियेत नगरपालिका सभागृहामध्ये यावल नगरपालिका उपनगराध्यक्ष पदासाठी काँग्रेसच्या शिला श्रीधर सोनवणे यांनी नाम निर्देशन अर्ज दाखल केले होते व उपनगराध्यक्षपदासाठी शिला सोनवणे ह्या एकमेव उमेदवार असल्याने त्यांची यावल नगरपालिका उपनगराध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली. तसेच स्वीकृत नगरसेवकपदी रईस आर.मोहसीम, डॉ.कुंदन आर.फेगडे यांची स्वीकृत सदस्य म्हणून निवड करण्यात आली. यावल उपनगराध्यक्ष पदाच्या निवड प्रक्रियेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सोमनाथ आढाव, नवनिर्वाचित नगराध्यक्ष सुरेखा कोळी यांची उपनगराध्यक्षांचे स्वागत केले. तसेच उपस्थित नगरसेवक दिपक बेहडे, अतुल पाटील, युनूस खान, मुकेश येवले, सुधाकर चौधरी, डॉ.कुंदर फेगडे, रईस धनगर, आर.मोहसीन, पौर्णिमा फालक यांची उपस्थिती होते.
रावेर उपनगराध्यक्षपदी सुधीर पाटील बिनविरोध
रावेर । नगर पालिकेच्या उपनगराध्यक्षपदी सुधीर गोपाळ पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली तर स्विकृत नगरसेवक म्हणून प्रकाश अग्रवाल व जगदीश घेटे यांच्या निवडीची घोषणा नगराध्यक्ष दारा मोहम्मद यांनी केली. यावेळी त्यांच्यासोबत मुख्याधिकारी राहुल पाटील देखील उपस्थित होते. यावेळी नगरसेवक अँड सुरज चौधरी, राजेंद्र महाजन, आसिफ मोहम्मद, प्रल्हाद महाजन, यशवंत दलाल, शेख सादिक, नबी शे नुसरत, कलीम खा, असदुल्ला खा, शारदा चौधरी, संगीता महाजन, संगीता वाणी, ललिता बर्वे, रंजना गजरे, संगीता अग्रवाल, पार्वताबाई शिंदे, हमीदाबी पठाण, इत्यादि नगरसेविका उपस्थित होत्या. यावेळी नवनिर्वाचित निवड केलेल्यांची भास्कर महाजन, योगेश गजरे, भागवत पाटील, पंकज महाजन, आकाश भालेराव, राजू जैसवाल, पोलिस पाटिल जितेंद्र लोहार, पंकज वाघ, मुन्ना अग्रवाल, महेमूद भाई, मो शफी, सुधाकर नाईक, नितिन महाजन, संजय पाटील, महेंद्र गजरे, विक्रम बोरकर आदिंनी अभिनंदन केले. रावेर शहराचा सर्वांगिण विकास करण्याचा प्रयत्न आम्ही करू असे आश्वासन यावेळी दिले. स्वच्छता, विकास, दरेरोज गटारींची स्वच्छता यावर आमचा भर राहील गरिबांना घरकुल मिळण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची माहिती नगराध्यक्ष दारा मोहम्मद यांनी दिली.