चाळीसगाव – गेल्या अनेक वर्षापासून आम्ही शासन दरबारी सारखा पाठपुरावा करतो आहोत. या रोजंदारी कर्मचाऱ्यापैकी अनेक कर्मचारी वारले तर अनेक सेवानिवृत्त झाले. त्यांच्या जीवनात “कायम” झाल्याचा आनंद राहून गेला मात्र उशिरा का होईना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चाळीसगाव पालिकेतील १८९ रोजंदारी कर्मचारी कायम केले. मुख्यमंत्र्यांना भेटून हा प्रश्न धसास लावणारे आमदार उन्मेष पाटील हे देखील आमच्यासाठी संकटमोचन ठरले आहेत. काही अडचणी आहेत त्या मार्गी लावण्यासाठी त्यांनी पुढाकार घ्यावा अशी अपेक्षा व्यक्त करीत आज पालिकेच्या कायम झालेल्या कर्मचाऱ्यांनी आमदार उन्मेष पाटील यांचा सत्कार केला.
यावेळी नगरपरिषद कर्मचारी युनियनचे अध्यक्ष तथा अभियंता राजेंद्र पाटील, पेन्शनर कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष डी एस मराठे, नगराध्यक्षा आशालता चव्हाण, मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर, गटनेते संजय पाटील, भाजप शहराध्यक्ष तथा नगरसेवक घृष्णेश्वर पाटील, नगरसेवक नितीन पाटील उपस्थित होते. याप्रसंगी आमदार उन्मेष पाटील यांनी रोजंदारी कर्मचारी याचा हा प्रश्न माझ्यासाठी मोठा जिव्हाळ्याचा विषय असल्याचे सांगितले. कामगार बंधूंनो आता प्रामाणिकपणे शहरवासियांना सेवा द्या. त्रुटी दूर होण्यासाठी मी प्रयत्नशील आहे. अशी ग्वाही त्यांनी दिली. यावेळी युनियनचे विजय खरात, प्रेमसिंग राजपुत, नंदू जाधव, संजय राजपुत, दिपक देशमुख, बिभीषण पाटील, भूषण लाटे, वकार शेख, सलीम शेख, दिपक जाधव, अनिल देशमुख, जितेंद्र जाधव, दिलीप चौधरी, किशोर देशमुख, अमित सोनवणे हे कर्मचारी अधिकारी उपस्थित होते.
-फोटो आहे