पालिकेसमोरील ‘नो-पार्किंग’मधील वाहनांवर कारवाई

0

20 चारचाकी वाहनांना जॅमर

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेसमोरील पुणे-मुंबई महामार्गावर बेकायदेशीरपणे ‘नो पार्किंग’मध्ये पार्क केलेल्या वाहनांवर पिंपरी विभागाच्या वाहतूक पोलिसांनी शनिवारी धडक कारवाई केली. वाहने रस्त्यावर पार्क केल्यामुळे नागरिकांना चालणे देखील अवघड होत आहे. या रस्त्यांवर वाहने उभी राहिल्याने वाहतूक कोंडी होते. या कारवाईत 20 चारचाकी वाहनांना जॅमर लावण्यात आले आहे, अशी माहिती वाहतूक पोलिस निरीक्षक आर. एस. निंबाळकर यांनी दिली.

निंबाळकर म्हणाले की, महापालिकेच्या मुख्यालसमोरील मुंबई-पुणे महामार्गावर नो पार्किंग झोनमध्ये वाहने पार्क केली जातात. रस्त्यावर नो पार्किंगमध्ये लावण्यात आलेल्या 20 चारचाकी वाहनांना पोलिसांकडून जॅमर लावण्यात आला असून त्यांच्याकडून दंड वसूल केला जाणार आहे. दुपारपासून नो-पार्किंगमधील वाहनांवर कारवाई सुरु होती. दरम्यान, पालिकेच्या मुख्यालसमोरील मुंबई-पुणे महामार्गावर नो पार्किंग झोनमध्ये वाहने पार्क केली जातात. त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले जाते. वाहने रस्त्यावर पार्क केल्यामुळे नागरिकांना चालणे देखील अवघड होत आहे. महासभा, स्थायी समिती सभेच्या दिवशीतर पालिकेच्या समोर वाहनांच्या लांबच-लांब रांगा लागलेल्या असतात. याकडेही लक्ष देणार आहोत.