चोपडा। अखिल भारतीय पालिवाल समाजातर्फे येत्या एप्रिल महिन्यात 1 ते 6 एप्रिलदरम्यान आशापूर्णा धाम, गुराडिया (मध्यप्रदेश) येथे महाकुंभ मेळाव्याचे आयोजन होत आहे. या महाकुंभासाठी चोपड्यातून दोन पालिपुत्र चोपडा ते गुराडिया या 450 किलोमीटरच्या पदयात्रेसाठी सोमवारी (दि. 20) रवाना झाले, अशी माहिती महाराष्ट्र प्रभारी अनिलकुमार पालिवाल यांनी दिली. शहरातील आनंदीभवानी मंदिरात सोमवारी, सकाळी चोपडा पालिवाल समाजाकडून या दोघेही पदयात्रींना सन्मानपूर्वक निरोप देण्यात आला.
समाजबांधवांकडून पालिवाल यांना निरोप
पदयात्रेत अशोक भानुदास पालिवाल, रमेश (राम) नारायणदास पालिवाल यांचा समावेश आहे. पालिवाल समाजाच्या इतिहासात आतापर्यंत सर्वांत मोठी ही पदयात्रा असून, त्यांना आशापूर्णा देवी यासाठी शक्ती देवो, अशी भावना महाराष्ट्र पालिवाल परिषदेचे अध्यक्ष कांतिलाल पालिवाल यांनी व्यक्त केली. या पदयात्रींना निरोप देण्यासाठी विकास पालिवाल, प्रदीप पालिवाल, सुनील पालिवाल, शाम पालिवाल, योगेश पालिवाल यांच्यासह चोपडा पालिवाल समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.