वाघझीरा, लालमाती केंद्रातील विद्यार्थ्यांनी घेतला सहभाग
रावेर – पाल अनुदानित आश्रम शाळेत क्रीडा स्पर्धा उत्साहात पार पडला. आयोजित केलेल्या विविध स्पर्धांमध्ये विजयी खेडाळुचा शाळेतर्फे गौरव करण्यात आला. या स्पर्धेत रावेर तालुक्यातील यावल प्रकल्पांतर्गत वाघझीरा लालमाती केंद्रातील क्रीडा स्पर्धा ११ आणि १२ ऑक्टोबर रोजी दोन दिवस चालल्या या क्रीडा स्पर्धेत एकूण 13 ऑक्टोबर 2018 आश्रम शाळेतील विद्यार्थिनींनी सहभाग नोंदविला होता.
मुख्याध्यापकांनी केले मार्गदर्शन
या स्पर्धेचे उद्घाटन विस्तार अधिकारी विलास राणे यांनी केले तर अध्यक्षस्थानी लोकसेवक मधुकरराव चौधरी आश्रम शाळेचे मुख्याध्यापक सुधाकर झोपे होते. प्राथमिक पाल आश्रम शाळेचे मुख्याध्यापक गोविंदा अत्तरदे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन श्रीमती पाचपांडे तर आभारप्रदर्शन श्री.साठे यांनी मानले. या स्पर्धेत विजयी खेळाडूंना सातपुडा विकास मंडळाचे अध्यक्ष माजी आमदार शिरीष चौधरी व सातपुडा विकास मंडळाचे सचिव अजित पाटील यांनी अभिनंदन केले. कार्यक्रमासाठी शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.