पाळधी येथे रोज गरजू व रस्त्याने जाणाऱ्या लोकांसाठी रोज ४० किलोची खिचडीचे वाटप

0

पाळधी। सध्या देशात व महाराष्ट्रमध्ये लॉकडाऊन असल्याने महाराष्ट्रतील व बाहेरून आलेल्या महाराष्ट्रमध्ये असणाऱ्या पायदळी जाणाऱ्या लोकांसाठी रोज पाळधी येथे ४० किलो तांदुळाची खिचडी बनवून वाटप सुरू आहे. हा उपक्रम गुलाबराव पाटील फौंडेशन यांच्यामार्फत करण्यात येत आहे. या उपक्रमासाठी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव गुलाबराव पाटील, बालाजी किराणा पाळधी, सुनील भाऊ, पप्पू तिवारी, गोपी पाटील, शरद माळी, आबा माळी, मच्छिद्र कोळी, भैय्या कोळी, राजू वामन पाटील, राजू झावरू पाटील, मुन्ना थोरात, यशवंत पाटील ,जितेंद्र चौधरी, दिलीप थोरात, भिकन राजपूत फुलपाट यांचे सहकार्य लाभत आहे.